Jawan Box Office Collection Day 19: शाहरुख खानचा (shahrukh khan) ‘जवान’ रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 75 कोटींची जबरदस्त ओपनिंग असलेल्या या चित्रपटाचे कलेक्शन थांबत नाहीये आणि हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट दररोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. ‘जवान’ ने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्वात जलद आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनून इतिहास रचला आहे. हा चित्रपट आता 600 कोटींचा टप्पा पार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जाणून घेऊया ‘जवान’ रिलीजच्या 19व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या सोमवारी किती कोटी रुपये जमा झाले?
7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ने जबरदस्त कलेक्शन करून देशालाच नव्हे तर परदेशी बॉक्स ऑफिसवरही आश्चर्यचकित केले आहे. या चित्रपटाने देशांतर्गत बाजारात पहिल्या आठवड्यात एकूण 389.88 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर ‘जवान’चे आठवड्यातील कलेक्शन 136.10 कोटी रुपये होते. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यातही ‘जवान’चा आवाज घुमतोय.
या चित्रपटाने तिसऱ्या शुक्रवारी 7.60 कोटींची कमाई केली. त्यामुळे तिसऱ्या शनिवारी चित्रपटाच्या कमाईत झेप नोंदवली गेली आणि त्याने 12.25 कोटी रुपयांची कमाई केली. तिसऱ्या रविवारी ‘जवान’ने 22.4 टक्क्यांच्या उडीसह 14.95 कोटींचा व्यवसाय केला. आता चित्रपटाच्या रिलीजच्या 19व्या दिवसाच्या म्हणजेच तिसऱ्या सोमवारी कमाईचे प्रारंभिक आकडे आले आहेत. याउलट तिसऱ्या सोमवारी पुन्हा ‘जवान’च्या कलेक्शनमध्ये मोठी घट झाली आहे.
तिसऱ्या सोमवारी शाहरुख खानच्या चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण झाली आहे. असे असतानाही हा चित्रपट आता ६०० कोटींचा टप्पा पार करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला असून अवघ्या 19 दिवसांत 1000 कोटींचा आकडा पार केला आहे. ‘जवान’चे दिग्दर्शन एटली कुमार यांनी केले आहे.
शाहरुख खान व्यतिरिक्त नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, एजाज खान, सुनील ग्रोवर, रिद्धी डोगरा यांच्यासह अनेक स्टार्सनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. संजय दत्त आणि दीपिका पदुकोण यांनी चित्रपटात खास कॅमिओ केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
स्वतःच्याच नावाने सोनू सूद देतो बायकोला आवाज, जाणून घ्या त्यांची प्यारी वाली लव्हस्टोरी
रबने बना दी जोडी, परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांच्या लग्नातील सुंदर फोटो आले समोर