Tuesday, June 10, 2025
Home बॉलीवूड ‘माझ्या मुलींना सांभाळणे खूप अवघड’, अनन्या पांडेच्या लग्नावर चंकी पांडेचे मत

‘माझ्या मुलींना सांभाळणे खूप अवघड’, अनन्या पांडेच्या लग्नावर चंकी पांडेचे मत

अभिनेता चंकी पांडे बॉलिवूडमध्ये मागील अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. आता चंकीची मुलगी अनन्या पांडे देखील चित्रपटांमध्ये आली असून, तिने खूपच कमी काळात स्वतःचे उत्तम स्थान येथे निर्माण केले आहे. अनन्याने आतापर्यँत मोजकेच सिनेमे केले असले तरी तिची फॅन फॉलोविंग कमाल आहे. नुकताच अनन्याचा ‘गहराईयां’ सिनेमा अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला असून, सध्या अनन्या याच सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अनन्याने दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आदी बड्या कलाकारांसोबत काम केले आहे.

अनन्या नेहमीच चित्रपटांसोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे, विविध कारणांमुळे सोशल मीडियावर आणि मीडियामध्ये गाजताना दिसते. कधी कधी अनन्याला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. नुकत्याच एक मुलाखतीमध्ये अनन्याचे आईबाबा असणाऱ्या चंकी पांडे आणि भावना पांडे यांनी अनन्याबद्द्दल मोकळेपणाने चर्चा केली. या मुलाखतीमध्ये चंकी पांडे म्हणाला की, “मी माझ्या मुलींना अतिशय लाडाने मोठे केले आहे. माझी आणि माझ्या पत्नीची इच्छा आहे त्यांना आयुष्यात सर्व काही दयायचे. माझ्या मुलींना सांभाळणे कुठलेही सोपे काम नाही. मी माझ्या मुलींना त्यांच्या जन्मापासून सहन करत आलो आहे. मला माहित आहे त्या किती मस्तीखोर आहेत. मला तर त्या मुलांबद्दल वाईट वाटते ज्यांच्यासोबत त्या लग्न करतील. माझ्या मुलींचा लग्नावर विश्वास आहे. कारण त्यांनी अगदी लहानपणापासूनच त्यांच्या आजूबाजूला प्रेमाने भरलेले अनेक नाती बघितली आहेत.”

हेही पाहा- सलमान सोबत बॉलिवूड मध्ये केलेले पदार्पण, मात्र सध्या विकेतेय घरोघरी जेवणाचे डब्बे | Pooja Dadwal

अनन्याने २०१९ साली करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ‘पती पत्नी और ओह’, ‘खाली पिली’ आदी सिनेमांमध्ये दिसली लवकरच ती साऊथ सुपरस्टार विजय देवरगोंडासोबत ‘लायगर’ सिनेमात दिसणार आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा