Tuesday, June 18, 2024

प्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मश्री पंडित विजय कुमार किचलू यांचे दुःखद निधन

प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित विजय कुमार किचलू यांचे १७ फेब्रुवारी शुक्रवारी संध्याकाळी दुःखद निधन झाले आहे. पंडित विजय कुमार किचलू यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांना कलकत्त्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी त्यांचे वय ९३ वर्ष होते. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

कोलकात्याच्या रुग्णालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार पंडित विजय कुमार किचलू यांना दम लागत असल्यामुळे रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र इलाज चालू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि संध्याकाळी ६.२० च्या दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांना याआधी जानेवारीमध्ये देखील हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हा देखील त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. माहितीनुसार पंडित विजय कुमार किचलू यांना हृद्यासंबंधी आणि अन्य आजारांच्या तक्रारी होत्या.

पंडित विजय कुमार किचलू यांचा जन्म १९३० साली झाली होता. त्यांनी त्यांच्या भावासोबत रवी किचलूसोबत मिळून शास्त्रीय गायकाची जोडी बनवली होती. ते २५ वर्ष आयटीसी संगीत अनुसंधान अकादमीच्या संस्थापक पदी विराजमान होत काम केले होते. त्यानी भारतीय शास्त्रीय संगीतात येणाऱ्या नवीन प्रतिभावान कलाकारांसाठी संगीत अनुसंधान अकादमीची स्थापना केली होती. किचलू यांना २०१८ साली पदमश्री देऊन सन्मानित केले गेले.

तत्पूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांनी पंडित विजय कुमार किचलू यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. ममता बॅनर्जी यांनी पंडित विजय कुमार किचलू निधनामुळे संगीत क्षेत्राची हानी झाल्याची भावना व्यक्त केली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! ऍक्शनचा तडका असलेला ‘फेमस’ चित्रपट येतोय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

‘बिग बाॅस 16’चा विजेता एमसी स्टॅन इंस्टग्रामवरुन करताे भक्कड कमाई, आकडे पाहून तुम्हीही व्हाल थक्क

हे देखील वाचा