Tuesday, June 24, 2025
Home टेलिव्हिजन लाडक्या लेकाचे फोटोशूट करणे भारतीला पडले महागात, हुक्का पॉट पाहून नेटकऱ्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

लाडक्या लेकाचे फोटोशूट करणे भारतीला पडले महागात, हुक्का पॉट पाहून नेटकऱ्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग (Bharati Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachia) काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलाचे पालक झाले आहेत. आपल्या मुलाच्या जन्मापासून दोघेही त्यांच्या पालकत्वाचा आनंद घेत आहेत. बराच काळ मुलाला लोकांपासून लपवून ठेवल्यानंतर आता या जोडप्याने चाहत्यांना त्यांच्या मुलाची झलक दाखवली आहे. यासोबतच आता भारती आणि हर्ष त्यांच्या मुलाचे ताजे फोटो वेळोवेळी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अलीकडेच भारतीने तिच्या मुलाचा एक नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

भारती तिच्या मुलाचे वेगवेगळ्या लूक आणि स्टाइलमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. या सीक्वेन्समध्ये नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या मुलाची वेगळी स्टाइलही पाहायला मिळाली. शेअर केलेल्या फोटोमध्ये भारती सिंगचा मुलगा लक्ष्य पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या खुर्चीवर बसलेला दिसत आहे. पण या चित्राकडे एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या फोटोमध्ये लक्षच्या शेजारी एक हुक्का दिसत होता.

लक्षच्या फोटोवर चाहते नेहमीच जोरदार प्रतिक्रिया देत असतात. मात्र यावेळी फोटोतील हुक्का पाहून चाहते भारतीवर थोडे रागावलेले दिसले. चित्रात दिसणारा हुक्का पाहून एका यूजरने म्हटले की, “मुल खूप गोंडस दिसत आहे, पण हुक्का हा आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे, तो अजिबात चांगला नाही,” त्याचवेळी एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, ‘बाकी सर्व काही  ठीक आहे.पण हा हुक्का कोणत्या आनंदात ठेवला आहे,” असा प्रश्न भारतीला विचारला आहे. याशिवाय इतरही अनेकजण हा हुक्का पाहून प्रश्न विचारताना दिसले. फोटोमध्ये दिसणारा हुक्का बनावट असला तरी चाहत्यांना तो फारसा आवडला नाही.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

 

यापूर्वी भारतीने हॅरी पॉटर लूकमध्ये तिच्या मुलाचे फोटोशूट केले होते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडले होते. मात्र, यावेळी भारतीची स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरली नाही. विशेष म्हणजे भारती सिंह-हर्ष लिंबाचिया डिसेंबर २०१७ मध्ये विवाहबद्ध झाले. लग्नाच्या चार वर्षानंतर भारतीने 2021 मध्ये तिच्या इन्स्टाग्रामवर आई होणार असल्याची घोषणा केली, त्यानंतर एप्रिलमध्ये या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले.

हेही वाचा –

‘या’ राजवाड्यात झालं ‘भूलभुलैया’चं शूट; कोणी ऐकला विचित्र आवाज, कोणी म्हटलं, ‘शिरच्छेद केलेला माणूस दिसला’

कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या अभिनेत्रीच्या कारचा अपघात!

सर्वाधिक कमाई करणारी साऊथ अभिनेत्री बनली नयनतारा, एका चित्रपटासाठी घेते तब्बल ‘इतके’ मानधन

हे देखील वाचा