Wednesday, April 17, 2024

‘या’ राजवाड्यात झालं ‘भूलभुलैया’चं शूट; कोणी ऐकला विचित्र आवाज, कोणी म्हटलं, ‘शिरच्छेद केलेला माणूस दिसला’

साल २००७मध्ये आलेल्या ‘भूल भुलैया’ चित्रपटाचा सिक्वेल अजूनही ओटीटी वर पाहिला जात आहे. ‘भूल भुलैया’ प्रमाणेच सिक्वेलनेही खूप प्रशंसा मिळवली. पण ‘भूल भुलैया’ बनवताना शुटिंगच्या वेळी जे कोणी हजर होते, त्यांनी सांगितले की, त्यादरम्यानचे अनुभव नेहमीच स्मरणात राहतील. हा चित्रपट एका अलौकिक थीमवर आधारित होता. त्यावेळच्या बातम्यांमध्ये असे सांगितले गेले होते की, चित्रपटाच्या युनिटमधील बर्‍याच लोकांना शूटिंग करताना विचित्र गोष्टी जाणवल्या.

वाऱ्याची झुळूक अन् येणारा आवाज!
‘भूल भुलैया’ हा प्रियदर्शनच्या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. जेव्हा हा चित्रपट हिंदीत बनवण्याचा विचार केला, तेव्हा त्यांनी चित्रपटाचा मुख्य भाग जयपूरजवळील चोमू पॅलेसमध्ये शूट करण्याचा निर्णय घेतला. राजवाड्यांबद्दल अनेकदा स्थानिक किस्से आणि कथा सांगितल्या जातात. शूटिंग युनिटलाही या महालाबद्दल अशा गोष्टी ऐकायला मिळाल्या. (bhool bhulaiyaa shooting haunted palace chomu rajasthan jaipur)

त्यानंतर शुटिंगच्या वेळी लोकांनी आपापले अनुभवही मांडले. शूटिंगशी संबंधित लोकांनी त्यावेळी सांगितले की, पॅलेसमध्ये पूर्ण शांतता आहे. पण जेव्हा शूटिंग संपवून सगळे निघून जायचे आणि फक्त पॅकिंगचे काम राहायचे, तेव्हा तिथे उपस्थित लोकांना तिथे कोणीतरी आहे असे वाटायचे. सुरुवातीला त्यांना वाटले की, जोराचा वारा आणि त्यातून निर्माण होणार्‍या आवाजामुळे त्यांना हे जाणवले असावे. पण हळूहळू त्यांना आपल्या आजूबाजूला खरोखर कोणीतरी आहे असे वाटू लागले.

काय म्हणाले दिग्दर्शक?
स्थानिक लोकांनीही चित्रपटाच्या युनिटला राजवाड्याचे अनेक किस्से सांगितले. एका युद्धादरम्यान त्या राजवाड्याच्या राजाचा शत्रूंनी शिरच्छेद केल्याचेही कोणीतरी सांगितले. ते म्हणाले की, असा मस्तक नसलेला माणूस राजवाड्यात फिरताना अनेकांनी पाहिला आहे. चित्रपटाचे शूटिंग चोमू पॅलेसमध्ये सुमारे २५ दिवस चालले आणि चित्रपटाच्या युनिटने त्या पॅलेसचे अनेक किस्से ऐकले आणि अनुभवले. पण शूटिंग पूर्ण झाले. याबाबत प्रियदर्शनला प्रश्न विचारले असते त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास नाही.

हेही वाचा

हे देखील वाचा