Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

अर्रर्र! भारती अन् तिच्या पतीने केली मोठी चूक? मुंबई पोलिसांनी धाडलं बोलावणं, सुजवून टाकला पाय

‘पोलीस’ हे नाव ऐकताच भल्याभल्यांना घाम फुटल्याशिवाय राहत नाही. गुन्हेगारांना तर या नावानेच धडकी भरते. मात्र, जर या नावाने कलाकारांनाही धडकी भरली आहे असं म्हणलं तर कदाचित अनेकांना विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरे आहे. प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्यासोबतही असेच काहीसे झाले आहे. भारत आणि हर्ष यांना पोलिसांनी बोलावले आहे. दोघेही चांगलेच घाबरले आहेत. भारती हर्षला विचारते की, त्याने गाडी चालवताना सिग्नल मोडला तर नाही ना? कुणाला गाडीने उडवलं तर नाही ना? कोणावर हात उचलला नाही ना? हर्ष स्वत:ची बाजू मांडत म्हणतो की, त्याने काहीच केले नाही. तो पुढे म्हणतो, मुंबई पोलिसांची ‘आता माझी सटकली आहे.’

भारतीने होस्ट केले ‘उमंग २०२२’
मुंबई पोलिसांशी भारती सिंग (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) यांचा सामना झाला आहे. मात्र, या दोघांनाही पोलिसांनी कोणत्याही गुन्ह्यासाठी नाही, तर त्यांचा ‘उमंग २०२२’ हा शो होस्ट करण्यासाठी बोलावले आहे. या शोमध्ये मुंबई पोलिसांनी अनेक कलाकारांना आमंत्रित केले होते. भारती आणि हर्ष यांनी मिळून सर्व कलाकारांसोबत मजा-मस्ती आणि मजेशीर प्रँक्सही केले. नेहमीप्रमाणे भारती सिंगने तिच्या कॉमेडी टायमिंगने सर्वांना पोट धरून हसवले.

भारती आणि हर्ष यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर ‘उमंग २०२२’मधील बिहाईंड द सीन्सचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये होस्ट करण्याच्या तयारीपासून ते महिला पोलिसांशी दोघेही ओळख करताना दिसले. मध्ये-मध्ये दोघांनीही अनेक गिफ्स आणि मीम्सही टाकले होते, यामुळे व्हिडिओला मनोरंजनाचा आणखी तडका मिळाला. सर्वप्रथम भारती आणि हर्षची भेट अक्षय कुमार याच्यासोबत स्टेजवर होते. अक्षयसोबत बोलल्यानंतर दोघेही टायगर श्रॉफ, कार्तिक आर्यन आणि मुंबई पोलिसांसोबत मजेशीर अंदाजात पाहायला मिळतात.

भारती सिंग हिला सर्वात जास्त आनंद शाहरुख खान याच्यासोबत स्टेज शेअर करून मिळाला. स्टेजवर भारतीने शाहरुखसोबत ‘आंखो में तेरी’ गाण्यावरही डान्स केला. विशेष म्हणजे, भारतीने ९-१० तास परफॉर्म केल्यानंतरही ती थोडीशी दमलेली दिसली. तिच्या बुटांची इलॅस्टिक तिच्या पायांना खूपच घट्ट बसली होती. जास्त वेळ उभे राहिल्यामुळे तिचा पाय सुजला होता. मात्र, तरीही कॉमेडियनने हार मानली नाही. तिने तहाणभूक विसरून शो होस्ट केला. विशेष म्हणजे, तिने शो पूर्ण केला आणि बॅक स्टेज सर्वांना किती मेहनत करावी लागली, याबाबतही सांगितले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
रणबीरची आलिया आहे लईच खमकी! अवघड सीनसाठी आजारी असूनही झालेली तयार, आख्ख्या सेटने वाजवलेल्या टाळ्या
डेंग्यू शेर, तर कंगना सव्वाशेर! आजारपणातही काम करतेय ‘पंगा क्वीन’, शूटिंगदरम्यानचा फोटो व्हायरल
असं का बरं! रिलीझनंतर स्वत:च्या सिनेमाकडे ढुंकूनही पाहत नाहीत बॉलिवूड सुपरस्टार्स, मोठ्ठं आहे कारण

हे देखील वाचा