Wednesday, March 27, 2024

रणबीरची आलिया आहे लईच खमकी! अवघड सीनसाठी आजारी असूनही झालेली तयार, आख्ख्या सेटने वाजवलेल्या टाळ्या

हिंदी सिनेसृष्टीत मोलाचे योगदान देणाऱ्या कपूर खानदानाची सून बनण्याचे भाग्य आलिया भट्ट हिला लाभले. आलियाने रणबीर कपूर याच्यासोबत संसार थाटला आणि दोनच महिन्यात प्रेग्नंसीची घोषणा केली. या अवस्थेतही आलिया तिच्या कामावर लक्ष देत आहे. ती तिच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकत आहे. तिचा ‘डार्लिंग्स’ हा सिनेमा नुकताच ओटीटीवर प्रदर्शित झाला. या सिनेमात आलियासोबत अभिनेत्री शेफाली शाह आणि विजय वर्मा यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या तिन्ही कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून पसंती मिळाली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन जसमीत के रीन करत आहेत. अशात त्यांनी या सिनेमातील एका सीनबद्दल सांगितले आहे, जो आजारी असूनही आलियाने शूट केला होता आणि तिच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट झाला होता.

‘डार्लिंग्स’ (Darlings) हा एक कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमात आलिया भट्ट (Alia Bhatt) अनेक वर्षे कौटुंबिक हिंसा सहन केल्यानंतर पतीकडून बदला घेण्याचा निर्णय घेते. शेफाली शाह यांनी या सिनेमात आलियाच्या आईची भूमिका साकारली आहे. एका सीनमध्ये आलिया तिच्या आईला तिच्या घरी बोलावते आणि सांगते की, तिने तिच्या पतीला बांधून ठेवले आहे. ती म्हणते की, “फिल्डिंग खूप झाली आई, आता बॅटिंग सुरू.” हा सीन शूट करताना आलियाची तब्येत ठीक नव्हती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ????☀️ (@aliaabhatt)

पूर्ण सेटवर झाला टाळ्यांचा कडकडाट
‘डार्लिंग्स’ या सिनेमाचे दिग्दर्शक जसमीत यांनी या सीनची आठवण सांगताना म्हटले की, “आलिया एकेदिवशी आजारी होती. मात्र, तरीही ती सेटवर आली होती. मला तिची भेट अजूनही आठवते. ती आजारी होती. त्यावेळी जवळपास एका पानाचे डायलॉग बोलायचे होते. मी तिला विचारले की, ती ठीक आहे ना. ती म्हणाली, ‘ती हा सीन करेल.’ आम्ही कॅमेरा रोल केला आणि आलियाने शानदार पद्धतीने हा सीन शूट केला, जे मला खूप आवडले. मात्र, त्यादिवशी सेटवर बरंच काही चांगलं घडलं. संपूर्ण सेटने उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. ती आजारी होती म्हणून नाही, तर तिने जे काही केले, ते सर्वांना आवडले. आलिया ही एक सकारात्मक व्यक्ती आहे.”

‘डार्लिंग्स’ या सिनेमातून आलियाने निर्माती म्हणूनही पदार्पण केले आहे. हा सिनेमा ५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या सिनेमात रोशन मॅथ्यू, राजेश शर्मा आणि किरण करमाकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
डेंग्यू शेर, तर कंगना सव्वाशेर! आजारपणातही काम करतेय ‘पंगा क्वीन’, शूटिंगदरम्यानचा फोटो व्हायरल
असं का बरं! रिलीझनंतर स्वत:च्या सिनेमाकडे ढुंकूनही पाहत नाहीत बॉलिवूड सुपरस्टार्स, मोठ्ठं आहे कारण
धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न, रक्ताच्या थारोळ्यात दवाखान्यात केले दाखल

हे देखील वाचा