कपिल शर्मा हा देशातील नंबर वन कॉमेडियन आहे. तो आपल्या जोक्सने प्रेक्षकांना खळखळून हसवतो. कॉमेडी आणि चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच कपिल आता गायनातही नशीब आजमावणार आहे. अलीकडेच कपिल शर्माने त्याच्या नवीन म्युझिक व्हिडिओ ‘अलोन’ चा टीझर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कपिल सीरियस स्टाईलमध्ये दिसत आहे, त्यामुळे सोशल मीडियावर त्याला भिन्नभिन्न प्रतिक्रिया येत आहेत. काही चाहत्यांना कपिलची नवीन स्टाईल आवडली आहे, तर काही युजर्स कपिलला या टिझरवरून ट्राेल करत आहेत.
कपिलच्या व्हिडिओवर चाहत्यांनी दिल्या भिन्नभिन्न प्रतिक्रिया
कपिलच्या( kapil sharma) या पोस्टवर कमेंट करताना एका युजरने लिहिले, “भाऊ, तुम्हाला सीरियस रोमँटिक अभिनय करताना पाहून मला हसू येत आहे.” तर दुसर्या युजरने कपिलच्या पाेस्टवर कमेंट करत लिहिले की, “कपिल सर, तुमचा शो चांगला चालला आहे… जबरदस्तीचा अभिनय चांगला दिसत नाही… असे वाटते की, मॅडमने तुमचे सामान चोरले आहे आणि तुम्ही चाेरीच्या नजरेने त्यांच्याकडे बघत आहात.” एका युजरने चक्क कमेंट करत लिहिले की, “कपिल पाजी तुम्ही रोमँटिक गाणी करत आहात, पण तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही कॉमेडी करत आहात असे दिसते.
View this post on Instagram
कपिलचा हा म्युझिक व्हिडिओ 9 फेब्रुवारीला हाेणार रिलीज
कपिल शर्मा त्याच्या आगामी म्युझिक व्हिडिओमध्ये अभिनयासोबतच गातानाही दिसणार आहे. कपिलशिवाय या गाण्यात प्रसिद्ध गायक गुरू रंधावा यांचा आवाजही ऐकायला मिळणार आहे. संगीत कंपनी टी-सिरीजने याची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर योगिता बिहानीही कपिलसोबत ‘अलोन’मध्ये अभिनय करताना दिसणार आहे. हा म्युझिक व्हिडिओ 9 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.(comedian kapil sharma new music video alone teaser out users troll comedian on social media )
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तुम्ही दिलेली साडी नेसतेय’, म्हणत अभिनेत्री विशाखा सुभेदाराने नेसली लता दीदींनी भेट म्हणून दिलेली साडी
अक्षयच्या बुटाखाली दाखवलेल्या भारताच्या नकाशाने देशभक्तांचे रक्त उसळले; म्हणाले, ‘हा कॅनेडियन कुमार …’