Friday, July 5, 2024

कपिल शर्माचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘यामुळे तुमची मर्दानगी संपत नाही’

खूप खस्ता खाऊन आज सुखकर आयुष्य जगणाऱ्या कॉमेडियनमध्ये कपिल शर्मा याचा समावेश होतो. कामासाठी जागोजागी भटकणारा कपिल आज जगातील अव्वल कॉमेडियन्समध्ये गणला जातो. आता तो एका गोष्टीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ते म्हणजे, त्याचे ट्रान्सफॉर्मेशन होय. खरं तर, कपिल शर्माचा एक फोटो समोर आला आहे, जो भलताच व्हायरल होत आहे.

कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) याने स्वत: त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. त्याचा हा फोटो पोस्ट होताक्षणीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, नेहमीपेक्षा तो एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. यामध्ये कपिलने फोटोला दिलेले कॅप्शनही त्याच्या चाहत्यांना आवडले आहे.

कपिल शर्माचा गुलाबी लूक
व्हायरल होत असलेल्या या फोटोत कपिल गुलाबी रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. सोबतच त्याने डोळ्यांवर चष्माही लावला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोसोबत त्याने एक मजेशीर कॅप्शनही दिले आहे. त्याने लिहिले आहे की, “मी आताच गुगल केले आहे. तमन्ना भाटिया तू हे वाचत आहे का की, मुले गुलाबी रंगाचे कपडे घालू शकतात का? हो, तू बरोबर वाचले. खरे मर्द गुलाबी रंगाचे कपडे परिधान करतात. गुलाबी हा मुलांसाठी एक मर्दानी आणि कूल रंग आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

भलीमोठी पोस्ट
कपिलने भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने पुढे लिहिले की, “इतिहासात गुलाबी रंग महिलांशी जोडला गेला नव्हता. १८व्या शतकात मर्द गुलाबी सिल्कचे सूट परिधान करण्यासाठी ओळखले जायचे, ज्यामध्ये फ्लोरल डिझाईन असायची. मर्द गुलाबी रंगाचे परिधान करतात आणि याने तुमचे पुरुषत्व संपत नाही.” या पोस्टमध्ये त्याने अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) हिलाही टॅग केले आहे. कलाविश्वातील कलाकारांनाही त्याची ही पोस्ट आवडली आहे. ते या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेता करणवीर वोहरा याने लिहिले की, “नाही पाजी, तुम्ही तुमच्या शानदार लूकने सर्वांनाच गुगली दिली आहे.”

तसेच, अभिनेत्री अर्चना पूरन सिंग (Archana Pooran Singh) यांनी कमेंट केली की, “खरं तर तू शोच्या शेवटच्या एपिसोडमध्ये जो गुलाबी रंगाचा आऊटफिट परिधान केला होता, तो माझा आवडता कपिल लूक आहे. मी गिन्नीलाही मेसेज केला होता. कारण, ती तुला स्टाईल करत आहे. तुझी स्टायलिस्ट बदलू नकोस.” भारतीय माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने लिहिले की, “क्या बात है, हिरो लूक. अक्षय कुमारलाही मागे टाकले. किलर लूक.”

कपिल शर्मा याच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर कपिल लवकरच त्याच्या कॉमेडी शोमधून पुनरागमन करत आहे. ‘द कपिल शर्मा शो’चे चौथे पर्व १० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या शोमध्ये नवीन चेहरे पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
सोनालीवर ताबा मिळवण्यासाठी तांत्रिकाचा वापर करायचा सुधीर सांगवान, जवळच्या व्यक्तीचा खळबळजनक दावा
तब्बल १२०० कोटींच्या ‘केजीएफ २’ सिनेमातील ‘या’ अभिनेत्याला झालाय कँसर, सूज लपवण्यासाठी वाढवली दाढी
मिनाक्षी राठोडने घातलं लेकीचं बारसं, खास स्टाईलमध्ये सांगितले मुलीचे नाव

हे देखील वाचा