प्रेक्षकांना खदखदून हसवणाऱ्या कपिल शर्माने शेअर केला मुलीसोबतचा गोंडस फोटो; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘एकदम भारी!’

Comedian Kapil Sharma Shares Cute Photo With Daughter Anayra Sharma Is Winning The Heart Over Internet


‘कॉमेडी’ म्हटलं की सर्वांच्या तोंडात आपसुकच जॉनी लिव्हर, कृष्णा अभिषेक, भारती सिंग अशा अनेक कॉमेडियन्सची नावे येतात. यांमध्ये आणखी एका कॉमेडियनच्या नावाचा समावेश होतो, तो म्हणजे ‘कपिल शर्मा’. कपिल शर्माने आपल्या मेहनतीने सर्वांच्या मनात आपली एक खास जागा निर्माण केली आहे. त्याचे चाहते जगभर आहेत. सोशल मीडियावरही तो चांगलाच सक्रिय असतो. तसेच आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या, वाईट गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतेच त्याची पत्नी गिन्नी छत्रत हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आणि याची माहिती त्याने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना दिली होती. आता प्रेक्षकांना खदखदून हसवणाऱ्या कपिलने नुकताच मुलीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे, जो भलताच व्हायरल होत आहे.

खरं तर कपिल शर्माने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर मुलगी अनायरासोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत कपिलने चिमुकल्या अनायराला कडेवर घेतले आहे. सोबतच ते दोघेही कॅमेऱ्याकडे हात दाखवताना दिसत आहेत. या फोटोवर चाहते भरभरून प्रशंसा करत आहेत. याव्यतिरिक्त अनेक बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारही कपिलच्या या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

या फोटोला कॅप्शन देत कपिलने “सर्वांना सुप्रभात” असे लिहिले आहे. फोटो पोस्ट केल्यानंतर केवळ २ दिवसांच्या आतच या फोटोला २४ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच या संख्येत वाढ होत आहे.

कपिल शर्माने १२ डिसेंबर, २०१८ रोजी गिन्नी छत्रत हिच्यासोबतच लग्न केले होते. लग्नाच्या एका वर्षानंतर म्हणजेच १० डिसेंबर, २०१९ रोजी गिन्नीने अनायरला जन्म दिला. आता कपिलच्या पत्नीने पुन्हा एकदा १ फेब्रुवारीला एका चिमुकल्या मुलाला जन्म दिला होता. त्यांच्या मुलाचे नाव जाणून घेण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कपिलच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर खुलासा केला होता की, तो लवकरच डिजिटलमध्ये पदार्पण करणार आहे. याबाबत अनेक अफवाही पसरल्या होत्या. परंतु यानंतर कपिलने म्हटले होते की, “ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. अफवांवर लक्ष देऊ नका. तुम्ही केवळ माझ्यावर विश्वास ठेवा. मी नेटफ्लिक्सवर येत आहे.”

कपिल आतापर्यंत कॉमेडी शोसोबतच चित्रपटांमध्येही झळकला आहे. त्याने ‘किस किसको प्यार करू’ आणि ‘फिरंगी’ या दोन चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अखेर गुड न्यूज आलीच.! करिना आणि सैफ दुसऱ्यांदा झालेत आई-बाबा; पाहा कोण आलंय जन्माला, युवराज की युवराज्ञी?

-सैफ अली खानवर फिदा होती परिणीती, तर ऋतिक रोशन होता ‘या’ अभिनेत्रीचा क्रश; जाणून घ्या बॉलिवड कलाकारांचे क्रश

-लव्ह, रिलेशनशीप आणि आत्महत्या…? जिया खानच्या मृत्यूचं आजवर न सुटलेलं कोडं!


Leave A Reply

Your email address will not be published.