विनोदाचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा कपिल शर्मा (Kapil Sharma) आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. कपिल शर्माने त्याच्या नवीन चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. आज ईदच्या निमित्ताने कपिलने त्याच्या नवीन चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे.
कपिल शर्माने त्याच्या चाहत्यांना ईदी दिली आहे. कपिलने आज ‘किस किस को प्यार करूं 2’ या त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये कपिल वराच्या भूमिकेत दिसत आहे आणि त्याच्यासोबत वधूच्या पोशाखात एक मुलगी देखील उभी आहे. परंतु, वधूने लांब बुरखा घातला आहे, त्यामुळे चेहरा दिसत नाही. कपिलने त्याच्या इंस्टाग्रामवर हे पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये फक्त ईद मुबारक लिहिले आहे. काही इमोजींचाही वापर करण्यात आला आहे. या पोस्टरच्या रिलीजनंतर चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘किस किस को प्यार करूं 2’ चे दिग्दर्शन अनुकल्प गोस्वामी यांनी केले आहे. अनुकलने चित्रपटाची कथाही लिहिली आहे. तर चित्रपटाची निर्मिती अब्बास-मस्तान यांनी रतन जैन आणि गणेश जैन यांच्यासोबत केली आहे. मात्र, हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
कपिलने 2015 मध्ये आलेल्या ‘किस किस को प्यार करूं’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. हा त्याचा पहिला चित्रपट होता, ज्यामध्ये अनेक अभिनेत्री दिसल्या. चित्रपटाच्या कथेत, कपिल तीन पत्नींचा पती होता आणि त्याशिवाय त्याला एक मैत्रीण देखील होती. या कॉमेडी ड्रामा चित्रपटात कपिल शर्मा व्यतिरिक्त, एली अवराम, वरुण शर्मा, सुप्रिया पाठक, शरत सक्सेना, अरबाज खान आणि मनोज जोशी हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये होते. हा चित्रपट अब्बास-मस्तान यांनी दिग्दर्शित केला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
आणि भेटीचा योग जुळून आला; उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ आणि दिग्पाल लांझेकर यांची भेट
बॉक्स ऑफिसवर चालेना सलमान खानची जादू; सिकंदरने दुसऱ्या दिवशी केली फक्त एवढीच कमाई