कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव यांना बुधवारी (दि. 21 सप्टेंबर) देवाज्ञा झाली. त्यांच्या निधनामुळे प्रत्येकाला धक्का बसला आहे. फक्त त्यांचे कुटुंबीयच नाही, तर त्यांच्या चाहत्यांनाही या बातमीवर विश्वास बसत नाहीये. राजूंच्या कानपूरच्या घरी मित्रमंडळींची गर्दी होत आहे. दुसरीकडे, सोशल मीडियावरही राजकारण्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अशातच त्यांची पत्नी शिखा श्रीवास्तव यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.
काय म्हणाल्या शिखा श्रीवास्तव?
चाहत्यांना पोट धरून हसायला भाग पाडणाऱ्या राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या पत्नी शिखा श्रीवास्तव (Shikha Srivastava) यांनी माध्यमांशी चर्चा केली. यादरम्यान त्यांनी सांगितले की, “मी आता बोलण्याच्या स्थितीत नाहीये. मी आता काय म्हणू शकते? त्यांनी खूप संघर्ष केला. मी वास्तवात आशा आणि प्रार्थना करत होती की, ते ही झुंज लढून परत येतील. मात्र, असे काहीच घडले नाही. मी फक्त इतकेच सांगू शकते की, ते एक खरे योद्धा होते.”
असे होते राजूंचे शेवटचे क्षण
राजू यांच्या मेहुण्यांनी सांगितले की, राजू यांच्यावर दिल्ली येथे अंत्यसंस्कार होतील. त्यांनी माध्यमांना सांगितले की, “सकाळी राजू यांचा बीपी कमी झाला होता. त्यानंतर त्यांना सीपीआर देण्यात आला. आधी त्यांनी प्रतिसाद दिला, परंतु नंतर त्यांनी प्रतिसाद देणे बंद केले. डॉक्टर, पुढच्या 2-3 दिवसात व्हेंटिलेटर हटवणार होते. औषधांचे प्रमाणही कमी केले होते. मात्र…”
कधी होणार अंत्यसंस्कार
राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबात पत्नी शिखा, मुलगा आयुष्मान आणि मुलगी अंतरा आहेत. ते तिघेही सध्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात आहेत. 22 सप्टेंबरला सकाळी राजू यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, असे सांगितले जात आहे. हाती आलेल्या वृत्तांंनुसार, राजू यांचे कुटुंबीय त्यांना मुंबई किंवा कानपूर येथे नेण्याच्या विचारात होते. मात्र, चर्चा केल्यानंतर कुटुंबीयांनी ठरवले की, ते राजू यांचे अंत्यसंस्कार दिल्लीतच करतील. त्यांच्या निधनानंतर अनेकजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
राजू यांच्या निधनाने कलाविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. ते त्यांच्या कॉमेडीने चाहत्यांचे खूप मनोरंजन करायचे. त्यांच्या निधनाने एका काळाचा अंत झाल्याची भावना चाहते व्यक्त करत आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ट्रक क्लिनर म्हणून सुरुवात ते पहिली कमाई 50 रुपये , असा होता राजू श्रीवास्तव यांचा संघर्ष
धर्माची खिल्ली ते बिग बॉस स्पर्धकाची मस्करी, ‘या’ कारणांमुळे विवादात अडकले होते राजू श्रीवास्तव
एकेकाळी गरिबीत दिवस काढलेल्या राजू श्रीवास्तव यांनी कमावून ठेवलीये बक्कळ संपत्ती