एकेकाळी गरिबीत दिवस काढलेल्या राजू श्रीवास्तव यांनी कमावून ठेवलीये बक्कळ संपत्ती

0
99
Raju-Srivastav
Photo Courtesy : Instagram/rajusrivastavaofficial

मनोरंजन जगतातून राजू श्रीवास्तव (Raju shrivastav) यांच्या निधनाची बातमी आल्याने सगळ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मागील अनेक दिवसापासून ते मुंबईतील एम्स रुग्णालयात मृत्यूसही झुंज देत होते. अखेर ते हरले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टी शोकसागरात आहे. अनेक कलाकार त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

राजू श्रीवास्तव हे कॉमेडीच्या जगातील सर्वात प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि भारतातील सर्वोत्तम विनोदी कलाकारांपैकी एक होते.. गजोधर भैय्याचे पात्र असो किंवा अभिनेत्याची नक्कल करणे असो, राजू श्रीवास्तव सर्वच बाबतीत सर्वोत्कृष्ट होते. अत्यंत गरिबीतून ते वर आले आहेत. आज त्यांनी कितीतरी संपत्ती कमावून ठेवली आहे. चला तर पाहुयात त्यांची एकूण संपत्ती किती आहे.

Raju-Srivastava
Photo Courtesy: Instagram/rajusrivastavaofficial

राजू श्रीवास्तव हे उत्तम कलाकार असण्यासोबतच भाजपचे नेतेही होते. अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम करून त्यांनी मोठा ठसा उमटवला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले राजू श्रीवास्तव मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. एक काळ असा होता जेव्हा त्यांना खूप अडचणी आणि गरिबीचा सामना करावा लागला होता, पण आज त्यांनी स्वतःच्या बळावर खूप संपत्ती कमावली आहे. आज त्यांनी खूप संपत्ती कमावून ठेवली आहे.

हेही वाचा-  बिग ब्रेकिंग! एका युगाचा अंत, मृत्यूशी झुंज संपली, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन

माध्यमातील वृत्तानुसार, राजू श्रीवास्तव यांची अंदाजे एकूण संपत्ती १५ -२० कोटींच्या दरम्यान आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, राजू होस्टिंग, जाहिरात, रिअॅलिटी शो आणि स्टेज शोमध्ये काम करून चांगली फी घ्यायचे.

राजू श्रीवास्तव हे साधे जीवन जगत असले तरी, त्यांच्याकडे ८२ .४८ लाख किमतीची ऑडी Q7 आणि ४६ .८६ लाख किंमतीची BMW ३ सीरीजसह इनोव्हा या गाड्या होत्या.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग बींची यांची मिमिक्री करून उमटवला अभिनयाचा ठसा, ‘असा’ आहे कॉमेडियन श्रीवास्तव यांचा जीवनप्रवास
बिग ब्रेकिंग! एका युगाचा अंत, मृत्यूशी झुंज संपली, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन
पडद्यावर शाहरुखला मारणे जेव्हा गुलशन ग्रोव्हरला खऱ्या आयुष्यात पडले महागात!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here