Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड परिस्थिती काय, बोलतोय काय! राजूंच्या अंत्यसंस्कारात चाहता कॉमेडियनसोबत सेल्फीसाठी उतावळा, व्हिडिओ व्हायरल

परिस्थिती काय, बोलतोय काय! राजूंच्या अंत्यसंस्कारात चाहता कॉमेडियनसोबत सेल्फीसाठी उतावळा, व्हिडिओ व्हायरल

मृत्यूशी झुंज देणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी 21 सप्टेंबर रोजी जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तब्बल 41 दिवस ते रुग्णालयात दाखल होते. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहतेही त्यांच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत होते. मात्र, असे काहीच झाले नाही. सर्वांचे लाडके ‘गजोदर भैय्या’ हे जग सोडून निघून गेले. दुसरीकडे, त्यांच्या अंत्यसंस्कारात सामील झालेले त्यांचे मित्र सुनील पालकडे एका चाहत्याने सेल्फीची मागणी केली. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

झाले असे की, 21 सप्टेंबर रोजी राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांचे सकाळी 10.20 वाजता दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या निगमबोध घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांसोबतच अनेक चाहतेही उपस्थित होते. आपल्या मित्राला शेवटचा निरोप देण्यासाठी कॉमेडियन सुनील पाल (Sunil Pal) आणि एहसान कुरेशी यांनीही हजेरी लावली होती. यादरम्यान एका चाहत्याने सुनीलकडे सेल्फीची मागणी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pinkvilla Telly (@pinkvillatelly)

सुनील पाल स्मशानभूमीत पोहोचले, तेव्हा ते राजूंबद्दल शोक व्यक्त करत होते. यादरम्यान गर्दीतून एक चाहता पुढे आला आणि त्याने सुनीलकडे सेल्फी मागितली. ते पाहून सुनीलही हैराण झाला. अशात सुनीलने चाहत्याला विनंती केली की, जागेचे गांभीर्य समजून इथून निघून जा.

सुनील पाल आणि राजू श्रीवास्तव हे अत्यंत जवळचे मित्र होते. दोघेही कॉमेडी शोमध्ये एकत्रही झळकले आहेत. राजूंच्या निधनानंतर सुनील खूपच चिंतेत होता. तो अनेकदा राजू बरे होण्यासाठी प्रार्थनाही करताना दिसला होता. दुसरीकडे, आपल्या मित्राला गमावल्यानंतर सुनील पाल हा खूपच दु:खी झाला होता.

राजू श्रीवास्तव याच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. त्यामध्ये सलमान खान, ऋतिक रोशन, शाहरुख खान यांसारख्या सुपरस्टार्सचा समावेश आहे. याव्यतिरिक्त त्यांनी ‘बॉम्बे टू गोवा’, ‘मैं प्रेम की दीवानी हूं’, ‘मैंने प्यार किया’ यांसारख्या सिनेमातही काम केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
राजूंच्या निधनामुळे अमिताभ बच्चनही गेले खचून; म्हणाले, ‘माझा आवाज ऐकून त्याने डोळे उघडलेले, पण…’
म्हणून प्रसिद्ध अभिनेत्यावर आली ‘बिग बॉस’मध्ये काम करण्याची वेळ; म्हणाला, ‘इतके सिनेमे देऊनही…’
यामुळे रणबीरने घेतले नाही ‘ब्रम्हास्त्र’साठी मानधन, दिग्दर्शकाने केले मोठा खुलासा

हे देखील वाचा