हुमा कुरेशीने कपिल शर्मासाठी गायले ‘हे’ गाणे; हसून हसून प्रेक्षकही झाले लोटपोट

0
84
kapil sharma
Photo Courtesy: Instagram/ sonytvofficial

साेनी वाहिनीवरील लाेकप्रिय काॅमेडी द कपिल शर्मा शाे  आपल्या नवीन सीजनसह प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. यावेळी शाेमध्ये बाॅलिवूड आणि स्पाेर्टस इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लाेक कार्यक्रमात पाहुणे म्हणून येणार आहे. नुकताच शाेचा नवीन व्हिडिओ समाेर आला आहे. ज्यात बाॅलिवूडच्या एका अभिनेत्रीने कपिलची बाेलती बंद केली आहे.  मंचावर येताच अभिनेत्रीने फ्लर्टी कपिल शर्माचे खिल्ली उडवली आहे. ही दुसरी काेणी नसून बाॅलिवूडची बेधडक अभिनेत्री हुमा कुरेशी ( Huma Qureshi) आहे. जी आपली वेबसीरिज महारानी सीजन 2 (Maharani Season 2)च प्रमाेशन करायला कपिल शाेमध्ये आली आहे. 

साेनी वाहिनीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा लेटेस्ट प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कुरेशी हिरव्या रंगाच्या आउटफिटमध्ये मंचावर दमदार एंट्री करते. तर कपिल शर्मा तिचं स्वागत करण्यासाठी हम्मा-हम्मा हे गाणं गायले. हुमा कुरेशी देखील गाण्यावर थिरकताना दिसली. यानंतर हुमा कपिलला त्याच्यासाठी गाणं गाण्याची इच्छा बाळगते.

हे एकूण कपिलचा आंनद गगनात मावत नाही. तेव्हा हुमा कपिलसाठी ‘भैया मोरे राखी के बंधन को निभाना’ गाणं गाते. हुमाच गाणं एकूण कपिलची बाेलती बंद हाेते आणि चेहऱ्यावरचा रंग उडून जाताे. मग हुमा कपिलला राखी बांधण्याचा प्रयत्न करते. ज्यावर अभिनेत्याच रिऍक्शन फारच मजेशीर असते. हुमाच्या या अंदाजसाठी शाेमध्ये बसलेले प्रेक्षक हसून हसून बेजार हाेतात. कपिलची अवस्था पाहून असे वाटते की, यापुढे ताे शाेमध्ये आलेल्या अभिनेत्रींसाेबत फ्लर्ट करणार नाही.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show ) 10 सप्टेंबरपासून शनिवार ते रविवार प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. यावेळी शाेमध्ये नव्या कॉमेडी कलाकारांचा सहभाग आहे. कपिलची पहिली टीम ‘काॅमेडी धुरंधर’ने शाे साेडला आहे. कृष्णा अभिषेक, भारती सिंग, चंदन प्रभाकरसह अनेक कॉमेडी कलाकार रिप्लेस झाले आहे. आता नवीन काॅमेडी कलाकारांसाेबत कपिल शर्मा नवीन सीजन घेऊन आले आहेत. नव्या टीममध्ये कीकू शारदा, सिद्धार्थ सागर, गौरव दुबे, सुमोना चक्रवर्ती दिसणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा:
बापरे! सुकेश गुन्ह्यात अडकलाय, हे माहित असूनही जॅकलिनने त्याच्याशी तोडले नव्हते संबंध; स्वप्नातील…
ड्रीम गर्ल 2 मध्ये आयुष्मान खुरानासोबत अनन्या पांडेला पाहून संतापले प्रेक्षक; म्हणाले, ‘मूड खराब…’
‘कौन बनेगा करोडपती’ व्हायरल प्रोमो, कोल्हापूरच्या गृहीणीने मिळवला पहिली करोडपती होण्याचा मान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here