Thursday, April 25, 2024

बापरे! सुकेश गुन्ह्यात अडकलाय, हे माहित असूनही जॅकलिनने त्याच्याशी तोडले नव्हते संबंध; स्वप्नातील…

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही सध्या सुकेश चंद्रशेखर याच्याशी निगजीत 200 कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणामुळे चर्चेत आहे. बुधवारी (दि. 14 सप्टेंबर) दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जॅकलिनची जवळपास 8 तास चौकशी केली होती. मागील महिन्यात अंमलबजावणी संचालनालयानेही आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये अभिनेत्रीला या प्रकरणात आरोपी सांगण्यात आले.

अंमलबजावणी संचालनालयाच्या आरोपपत्रात अभिनेत्रीबद्दल धक्कादायक खुलासा केला. त्यात सांगण्यात आले आहे की, तपासात जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही इतकी प्रभावित झाली होती की, तिला सुकेशच्या गुन्ह्यांबद्दल समजल्यानंतरही ती त्याच्याशी सातत्याने संपर्कात होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जॅकलिनला सुकेशसोबत लग्न करायचे होते आणि ती विचार करत होती की, सुकेश तिच्या स्वप्नांचा राजकुमार आहे.’

‘जॅकलिनने जाणूनबुझून संबंध संपवले नाहीत’
आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) एका अधिकाऱ्याने सांगितले की, तिच्यासाठी एक मोठी समस्या ही आहे की, तिने सुकेश गुन्ह्यांमध्ये अडकल्याचे माहित असूनही त्याच्याशी संबंध संपवले नव्हते. मात्र, नोरा फतेही हिला जसा संशय आला, तशी तिने स्वत:ला या प्रकरणापासून दूर ठेवले.

ईओडब्लूयचे विशेष पोलीस अधिकारी रविंदर यादव यांनी माध्यमसंस्थांना मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, “जॅकलिन फर्नांडिससाठी आणखी एक चिंताग्रस्त बाब आहे की, तिला सुकेशच्या गुन्ह्यांबद्दल माहिती असूनही त्याच्यासोबतचे संबंध संपवले नाहीत. मात्र, नोराला जसे याबद्दल समजले की, काहीतरी गडबड आहे, तेव्हा तिने स्वत:ला यापासून दूर केले.”

मॅनेजरला बाईक भेट
दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एक डुकाटी सुपरबाईक जॅकलिनचा मॅनेजर प्रशांत याच्याकडून जप्त केली आहे. या गाडीची किंमत तब्बल 8 लाख रुपये इतकी आहे. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की, सुकेशनेच प्रशांतला ही बाईक भेट म्हणून दिली होती.

जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. अशात जॅकलिनचे चाहत्यांनाही तिच्याबद्दल वाईट वाटतंय. आता या प्रकरणात पुढे काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अमिताभ बच्चन यांचा जुहूमधील ‘त्या’ बंगल्याविषयी मोठा खुलासा, एकाच क्लिकवर घ्या जाणून
सुपरस्टार धनुषचा ‘नेने वस्थुन्ना’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज, दुहेरी भूमिकेत झळकणार अभिनेता
‘डान्स आणि एक्शन सीन करु नकोस…’ ऋतिक रोशनला डॉक्टरांनी दिला सल्ला, अभिनेत्याचे उत्तर ऐकून कराल कौतुक

हे देखील वाचा