एका महिन्याहून अधिक काळ रुग्णालयात जीवन आणि मृत्यू यांच्यात झुंज दिल्यानंतर बुधवार (२१ सप्टेंबर) कॉमेडियन राजू श्रीवास्तव(Raju Srivastava) यांचे निधन झाले. मध्यंतरी कॉमेडियनच्या तब्येतीत सुधारणा झाली होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्यापासून ते बेशुद्ध पडले होते. कानपूरमध्ये जन्मलेले राजू श्रीवास्तव यांना गजोधर भैया म्हणत असे मात्र, त्यांचे खरे नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव आहे. पण तुम्हाला माहित आहे का? आपल्या काॅमेडीनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे राजू श्रीवास्तव किती शिकले आहे ? चला जाणून घेऊया…
काॅमेडियन राजू श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिसबंर 1963ला उत्तर प्रदेश येथे कानपुरमध्ये झाला. शाळेच्या दिवसांपासूनच त्यांना मिमिक्रीची आवड निर्माण झाली असल्याचे राजू यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितले की, रेडियाेवर इंदिरा गांधी यांचा आवज ऐकूण ते त्यांचा आवाज काढायचा प्रयत्न करत असे. त्यानंतर त्यांच्या घरी काेणीही आलं की, राजू यांचे वडील त्यांचा आवाज काढायला सांगत असे.
राजू यांच्या शिक्षणाबाबत फारशी माहिती नसली तरी, त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले हाेते की, शाळेच्या दिवसांमध्ये ते को-एजुकेशनमध्ये शिकले हाेते. यादरम्यान त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. बातचीत दरम्यान राजू यांनी सांगितले की, आपल्या मित्राला वर्गामध्ये एक्टिंग करत बघताना त्यांना खुप मज्जा यायची ज्यानंतर त्यांनी चित्रपट बघायला सुरुवात केली.
राजू यांच्या कुटुंबाविषयी बाेलायचे झाले तर, त्यांची मुलगी अंतरा देखील वडिलांसारखी मनाेरजंन क्षेत्रात काम करते. ती व्यवसायाने डायरेक्टर आहे. ‘फुल्लू’, ‘पलटन’, ‘द जॉब’, ‘पटाखा’ आणि ‘स्पीड डायल’ हे त्यांची दमदार चित्रपट आहे. तर राजू श्रीवास्व यांचा मुलगा सितार वादक आहे. वडिलांबराेबर त्यांची विशेष बाॅन्डिंग हाेती. त्याला वडिलांसाेबत अनेकदा त्यांच्या शाेमध्ये बघितलं गेलं आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धर्माची खिल्ली ते बिग बॉस स्पर्धकाची मस्करी, ‘या’ कारणांमुळे विवादात अडकले होते राजू श्रीवास्तव
ट्रक क्लिनर म्हणून सुरुवात ते पहिली कमाई 50 रुपये , असा होता राजू श्रीवास्तव यांचा संघर्ष
एकेकाळी गरिबीत दिवस काढलेल्या राजू श्रीवास्तव यांनी कमावून ठेवलीये बक्कळ संपत्ती