[rank_math_breadcrumb]

वाईट वाटतं राव! वडिलांवर झालेला विनोद सहन करू शकला नाही अभिषेक, शो मध्येच सोडून गेला निघून

बाॅलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनला त्याच्या कामावर जितके प्रेम आहे तितकेच महत्त्व तो आपल्या कुटुंबाला देतो. याच उत्तम उदाहरण त्याचा नुकताच आलेल्या व्हिडिओ आहे. ऍमेझाॅन मिनी टीव्ही शाे ‘केस तो बनता है’ च्या शाेमध्ये सुरू असलेल्या विनोदामुळे अचानक अभिषेक भडकतो आणि मध्येच उठून निघून जातो. अभिषेकला इतका राग आला तरी कशाचा? चला, तर मग जाणून घेऊया…

ऍमेझॉन मिनी टीव्ही शो ‘केस तो बनाता है’ (Case Toh Banta Hai) या शाेचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. या शोमध्ये परितोष त्रिपाठी(Paritosh tripathi), वरुण शर्मा आणि वकिलाच्या भूमिकेत असलेले रितेश देशमुख(Riteish Deshmukh) वेगवेगळे विनोद करून सेलेब्सची खिल्ली उडवतात. नुकताच असाच काहीसा प्रकार शोमध्ये आलेल्या अभिषेक बच्चनसोबत घडला. पण, कदाचित अभिषेकला (Abhishek bachchan) त्याचा विनोद फारसा आवडला नाही.

वडील अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांच्यावर परितोषने केलेला विनोद अभिषेक बच्चनला आवडत नाही आणि तो शोमधूनच उठून निघून गेला. मजेशीर विनोदांच्या दरम्यान त्याने शोच्या निर्मात्यांना बाेलून आक्षेप घेतला आणि मधातुनच शाे साेडला.आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेता त्याच्या वडिलांवर विनाेद केल्यामुळे नाराज दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

वडिलांच्या विनोदावर ज्युनियर बच्चन भडकला
‘केस तो बना है’च्या या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चन कोर्टरूममध्ये आणि कुश कपिला न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेला दिसत आहे. शोच्या दरम्यान परितोषने बिग बींबद्दल एक विनोद सांगितला, जो ऐकून अभिषेक संतापला. निर्मात्यांना फोन करून अभिनेता म्हणत आहेत की, “मी मूर्ख नाही.. हे जास्त होत आहे, मला जे काही बाेलायतचे आहे ते बोला, पण माझ्या पालकांकडे जाऊ नका. मी माझ्या वडिलांबद्दल थोडा संवेदनशील होतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

व्हिडिओमागील काय आहे सत्य?
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोणी याला प्रँक असल्याचे सांगत आहे, तर कोणी ते खरे असल्याचे सांगत आहे. आता व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे, हे येणारा वेळच सांगेल. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनची नाराजी योग्य आहे की नाही, यावर सध्या अनेक युजर्स कमेंट करत आहेत. मात्र, ज्युनियर बच्चनची ही नाराजी पाहून हे प्रँक आहे असे कोणीही म्हणू शकत नाही पण, हे अभिनयाचे जग आहे, येथे सर्व काहीच शक्य आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
फटाकडीच दिसते राव! नाेराने थाय हाय स्लिट गाऊनमध्ये केलं भन्नाट फाेटाेशूट; चाहतेही म्हणाले, ‘फिगर…’

गरोदर आलिया भट्टचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘हाेण्याऱ्या बाळासाठी रणबीरने…’