…म्हणून अजय देवगणमुळे अभिषेक बच्चनला रस्त्यावरच काढावी लागली होती रात्र, वाचा संपूर्ण किस्सा

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay devgan) हा अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) सिनियर असेल, पण दोघेही सुरुवातीपासून खूप चांगले मित्र आहेत. अजय देवगण आणि अभिषेक बच्चन दोघेही अनेकदा एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का? अजय देवगणमुळे अभिषेक बच्चनला रात्र रस्त्यावर झोपून काढावी लागली होती.

खरंतर, अजय देवगण आणि अभिषेक बच्चन यांची मैत्री १९९८ साली झाली होती, त्यावेळी ‘मेजर साब’ या चित्रपटाची शूटिंग सुरू होती. या चित्रपटात अभिषेक बच्चन प्रोडक्शन बॉय म्हणून काम करत होता. या चित्रपटाचे एक गाणे ऑस्ट्रियामध्ये चित्रीत होणार होते. प्रॉडक्शन बॉय असल्याने अभिषेक बच्चनला अजय देवगणला विमानतळावरून उचलून हॉटेलमध्ये थांबवावे लागले.

मात्र अजय देवगण हॉटेलमध्ये पोहोचताच तो ड्रिंक घेण्यासाठी खाली गेला आणि त्याने अभिषेकला ड्रिंक ऑफरही केली, पण त्याने नकार दिला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजय देवगणने पुन्हा अभिषेकला ड्रिंक ऑफर केली, तेव्हा अभिषेक म्हणाला, “जर तुम्ही मी माझ्या वडिलांना याबद्दल सांगितले नाही तरच मी पिईन. यानंतर एका मुलाखतीत अभिषेकने अजय देवगणसोबत ड्रिंक घेण्याचे खरे कारण सांगितले.

अभिषेकने सांगितले की, प्रॉडक्शन बॉय झाल्यानंतर त्याच्याकडून सतत चुका होत होत्या. सुरुवातीला तो अजय देवगणला विमानतळावरून हॉटेलपर्यंत नेण्यासाठी कार बुक करायला विसरला होता. त्यानंतर टॅक्सीने हॉटेलमध्ये पोहोचताच त्याला आठवले की त्याने अजय देवगणसाठी रूमही बुक केली नव्हती. यानंतर अभिषेक बच्चनने आपले सामान खोलीबाहेर फेकून दिले आणि खोली अजय देवगणला दिली. यामुळे त्यांना ती रात्र हॉटेलबाहेरील फुटपाथवर काढावी लागली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘लाल सिंग चड्डा’चे रामायणाशी आहे खास नाते, आमिर खानने सांगितली सिनेमाची सत्यता

चित्रपटाच्या पात्रावर प्रश्नचिन्ह उपास्थित करणाऱ्यांना जान्हवीने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली…

‘कबीर सिंग’च्या थप्पड सीनवर कियारा अडवाणीचे वक्तव्य; म्हणाली, ‘तुम्ही जेव्हा प्रेमात असता तेव्हा…’

Latest Post