Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड ‘खिलाडी’ अक्षय कुमारकडून भारताचा अपमान! वकिलाने थेट गृह मंत्रालयाकडे केली तक्रार

‘खिलाडी’ अक्षय कुमारकडून भारताचा अपमान! वकिलाने थेट गृह मंत्रालयाकडे केली तक्रार

बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, जे वर्षाकाठी फक्त एक सिनेमा देऊन शांत बसतात. मात्र, याव्यतिरिक्त असेही काही कलाकार आहेत, जे एका वर्षात तब्बल 4-5 सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतात. त्याच कलाकारांमध्ये सुपरस्टार अक्षय कुमार याच्या नावाचाही समावेश होतो. अक्षय हा त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. तसेच, तो अनेकदा या ना त्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यातही अडकल्याचे दिसते. यावेळीही असेच काहीसे झाले आहे. त्याच्याविरुद्ध एका वकिलाने थेट गृह मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. काय आहे प्रकरण चला सविस्तर जाणून घेऊया…

‘खिलाडी’ या नावाने ओळखला जाणारा सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) याचे मागील काही सिनेमे जोरदार आपटले. त्यानंतर आता तो त्याच्या ‘सेल्फी’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तो या सिनेमातील गाण्यांवर चाहत्यांसोबतच मोठमोठ्या कलाकारांसोबत ठुमके लावताना दिसत आहे. मात्र, त्याच्याकडून एक मोठी चूक घडली आहे, ज्यामुळे त्याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. भारताच्या नकाशाचा अपमान केल्याचा आरोप लावत त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
खरं तर, काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये तो एका आंतरराष्ट्रीय विमान कंपनीचा प्रचार करताना दिसला होता. यामध्ये तो जगाच्या नकाशावर चालताना दिसला होता. मात्र, ज्या ठिकाणी त्याचा पाय होता, त्याखाली भारताचा नकाशा होता. आता त्यामुळे त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. वकील वीरेंद्र पंजाबी (Advocate Virendra Punjabi) यांनी भावना दुखावल्या गेल्यानंतर जिल्ह्याच्या एसपीस गृह मंत्रालयात तक्रार केली आहे.

अक्षय कुमारव्यतिरिक्त दिसले होते हे कलाकार
अक्षय कुमार याच्या ज्या व्हिडिओमुळे खळबळ माजली आहे, तो व्हिडिओ स्वत: अक्षय कुमार यानेच शेअर केला होता. त्याने यासोबत लिहिले होते की, “उत्तर अमेरिकेत 100 टक्के शुद्ध देशी मनोरंजन आणण्यासाठी मनोरंजनकर्ते तयार आहेत. तुमचे सीट बेल्ट बांधून घ्या, आम्ही मार्चमध्ये येत आहोत!”

या व्हिडिओत अक्षयव्यतिरिक्त दिशा पटानी, नोरा फतेही, मौनी रॉय आणि सोनम बाजवा या अभिनेत्रीदेखील दिसत आहेत. त्यांची पावलं भारताच्या नकाशावर पडली नाहीत, त्यामुळे त्या यामधून थोडक्यात वाचल्या. मात्र, अक्षय चांगलाच फसला. आता या प्रकरणात पुढे काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (complaint filed against actor akshay kumar after he walked on indian map)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बबिताच्या दारू पिण्याच्या सवयीला वैतागले होते रणधीर कपूर, वेगळे राहूनही ‘या’ कारणाने घेतला नाही आजही घटस्फोट
कपूर खानदानातील असूनही एकेकाळी रणधीर कपूर यांनी केला होता हलाखीच्या परिस्थितीचा सामना मुलींची फी द्यायला पण… 

हे देखील वाचा