Sunday, April 14, 2024

कपूर खानदानातील असूनही एकेकाळी रणधीर कपूर यांनी केला होता हलाखीच्या परिस्थितीचा सामना मुलींची फी द्यायला पण…

बॉलिवूडमध्ये कपूर घरच्यांचा मोठा दबदबा आहे. या घराण्याने मागील अनेक दशकांपासून आणि पिढ्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या घराण्याची प्रत्येक पिढी अभिनयात आली आणि अमाप यश मिळवले. याच घराण्यातील एक अभिनेते म्हणजे रणधीर कपूर. रणधीर कपूर यांनी देखील त्यांच्या अजिबा, वडील, काका आदींप्रमाणे बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारली आणि मोठे यश मिळवले. आज जरी रणधीर चित्रपटांमध्ये सक्रिय नसले तरी त्यांचे सिनेमे प्रेक्षकांचे आजही मनोरंजन करण्यात पुढे आहे. अनेकदा रणधीर कपूर वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात आणि जुन्या आठवणींना उजाळा देतात. आज रणधीर त्यांचा 75 वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया रणधीर कपूर यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी.

बॉलिवूड सेलिब्रिटी बहिणी करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर एकमेकांवर प्रेम करण्यासाठी कधीही मागे हटत नाहीत. दोघीही त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात. या दोघी बहिणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत प्रत्येक क्षणाचे फोटो शेअर करत असतात. त्याचबरोबर कपूर बहिणींचे वडील रणधीर कपूर आणि आई बबिता यांच्याशी खूप चांगले बॉण्डिंग आहे. ज्याची झलक सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून दिसते. परंतु मोठे अभिनय कुटुंब आणि अभिनेता असूनही, रणधीर कपूर यांना आपल्या मुलींचे संगोपन करणे सोपे नव्हते.

एका थ्रोबॅक मुलाखतीत अभिनेते रणधीर कपूर यांनी आपल्या अडचणीबद्दल सांगितले होते. यादरम्यान ते म्हणाले होते की, “कलाकारांना आज पैसे कमवणे खूप सोपे झाले आहे. परंतु एक काळ असा होता, जेव्हा पैसे कमावणे खूपच कठीण होते.” त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, “माझ्या मुलींचे म्हणजेच करीना आणि करिश्मा यांच्या शिक्षणासाठी, वीज बिल भरण्यासाठी आणि माझ्या पत्नीचा खर्च भागवण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते.” (“There was a time when I had …”, actor Randhir Kapoor revealed the difficult situation)

त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, “कलाकार आजकाल किती पैसे कमवतात. आम्ही पैसे कमावण्यासाठी खूप मेहनत घेत होतो. मला अभिनयातून मिळवलेले पैसे माझ्या मुलींचे शिक्षण करण्यासाठी, घराचे वीज बिल भरण्यासाठी, पत्नी बबिताचा खर्च, माझे स्कॉच आणि इतर बिले भरण्यासाठी पुरेसे नव्हते.”

ते पुढे म्हणाले की, “आजचे कलाकार हे आपल्या कामाबद्दल खूप निवडक झाले आहेत. हे कलाकार वर्षाला फक्त एकच चित्रपट करत असतात. याचे मुख्य कारण असे की, ते एंडोर्समेंट, कार्यक्रम आणि इतर मार्गांनी देखील पैसे कमावत असतात. आम्ही वर्षाला फक्त एक चित्रपट करू शकत नसायचो. कारण जर आम्ही काम केले नाही, तर आमच्याकडे घर चालवण्यासाठी आणि सगळे बिल भरण्यासाठी पैसे नसायचे. त्यामुळे आम्हाला काम करावेच लागतील होते.”

रणधीर कपूर यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्याचबरोबर त्यांचा अभिनयक्षेत्रात शेवटचा चित्रपट ‘सुपर नानी’ हा होता. त्याचबरोबर त्यांनी ‘हाऊसफुल्ल 1 आणि 2’मध्येही आपली भूमिका साकारली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्याच दिवशी ऍडव्हान्स बुकिंगमध्ये ‘शहजादा’ने केली तब्बल इतक्या काेटींची कमाई; वाचून तुम्ही व्हाल थक्क

तुनिषाच्या आत्म’हत्ये प्रकरणी माेठा खुलासा; चंदन के आनंद म्हणाला, ‘एक दिवस आधी…’

हे देखील वाचा