Saturday, June 29, 2024

न्यूड फोटोशूट आले अंगाशी, आता दीपिकाचा ‘बाजीराव’ तुरुंगात फोडणार खडी?

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या बोल्ड फोटोशूटमुळे सतत चर्चेत आहे. जेव्हापासून अभिनेत्याने हे फोटोशूट केले आहे, त्यावर नेटकरी आणि सिनेतारकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, आता अभिनेता रणवीर न्यूड फोटोशूटमुळे अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. अभिनेत्याचे न्यूड फोटोशूट समोर आल्यापासून त्याला ट्रोल केले जात होते. एवढेच नाही, तर त्याच्यावर अनेक प्रकारचे मीम्सही व्हायरल होऊ लागले होते. मात्र आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, अभिनेत्याविरोधात तक्रारीत रणवीर सिंगवर (Ranveer Singh) ‘महिलांच्या भावना दुखावल्याचा’ आरोप करण्यात आला आहे. रणवीरचे हे न्यूड फोटो समोर आल्यापासून तो वादात सापडला आहे. हे फोटोशूट व्हायरल झाल्यानंतर आता यावर राजकारणही सुरू झाले आहे. अभिनेत्याच्या फोटोंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रमुख अबू आझमी यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले की, “सार्वजनिक ठिकाणी नग्न राहणे हे ‘कला’ आणि ‘स्वातंत्र्य’ आहे, मग हिजाब घालण्यावर ‘दबाव’ का?”

मात्र, अभिनेत्याच्या या फोटोशूटवर सिनेसृष्टीतील त्याचे मित्र त्याला सतत पाठिंबा देत आहेत. याच क्रमात नुकतीच रणवीरसोबत ‘रॉकी और रानी की लव्हस्टोरी’ या चित्रपटात दिसणार असलेली अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिनेही प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “मला माझ्या आवडत्या रणवीर सिंगबद्दल काहीही नकारात्मक ऐकायला आणि बोलायला आवडत नाही. मी त्याच्यावर नेहमीच प्रेम केले आहे आणि तो फक्त माझाच नाही, तर सर्वांचा आवडता कलाकार आहे. रणवीरने आपल्याला अप्रतिम चित्रपट दिले आहेत, त्यामुळे आपण त्याला फक्त प्रेम दिले पाहिजे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

याआधी अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यानेही त्याला पाठिंबा देत म्हटले होते की, “तो जे काही करतो, ती त्याची निवड, त्याला जे काही सोयीचे वाटते ते तो करतो. मला वाटते की, आपण त्याचा आदर केला पाहिजे.” याशिवाय खुद्द रणवीर सिंग यानेही या फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता की, तो हजारो लोकांसमोरही कपडे काढू शकतो आणि त्याला काही फरक पडत नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘मोगॅम्बो खुश हुआ’, म्हणत पडद्यावर क्रूर खलनायक रंगवणारे अमरीश पुरी, सिनेमात येण्यापूर्वी राबले विमा कंपनीत
दत्त साहेबांचा विषय खोल! भारतात बनलेल्या ‘त्या’ सिनेमात होतं फक्त एकच पात्र, गिनीज बुकमध्येही नोंद
घाणेरडा शर्ट आणि फाटलेली जीन्स घालून रस्त्यावर सिगारेट विकणारा पोरगा कसा बनला सुपरस्टार?

हे देखील वाचा