Saturday, April 20, 2024

दत्त साहेबांचा विषय खोल! भारतात बनलेल्या ‘त्या’ सिनेमात होतं फक्त एकच पात्र, गिनीज बुकमध्येही नोंद

हल्ली सिनेमा हिट होईल या आशेने निर्माते सिनेमात अनेक कलाकारांना कास्ट करतात. तशी स्क्रिप्ट लिहून पात्र तयार केली जातात. त्यामुळे एकप्रकारे प्रेक्षकांनाही आपले आवडते कलाकार रुपेरी पडद्यावर एकत्र पाहायला मिळतात. पण मंडळी तुम्हाला माहितीये का, भारतातील एक असा सिनेमा आहे, ज्यात फक्त आणि फक्त एकाच अभिनेत्यानं काम केलं होतं. तसेच या सिनेमाचं डिरेक्शन आणि प्रोड्यूसही त्याच अभिनेत्यानं केला होता. इतकंच नाही, तर या सिनेमाच्या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डही आहे. पण कोणता होता तो सिनेमा, कोण होता तो अभिनेता आणि काय होती त्या सिनेमाची कहाणी? जाणून घेऊया या लेखातून…

तो सिनेमा होता १९६४ साली आलेला ‘यादें.’ हाच तो सिनेमा, ज्यामध्ये फक्त आणि फक्त एकच अभिनेता होता. त्या अभिनेत्याचं नाव आहे सुनील दत्त. भारतातील उत्कृष्ट सिनेमांपैकी एक असलेल्या ‘मदर इंडिया’ या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनामनात घर करून राहणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे सुनील दत्त. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अतिशय महत्त्वाचं योगदान दिलंय. ‘पडोसन’सारख्या सिनेमात एका भोळ्या व्यक्तीच्या रोलपासून ते ‘मदर इंडिया’ आणि ‘३६ घंटे’ सारख्या सिनेमांमधील नकारात्मक भूमिकांपर्यंत, भारतीय प्रेक्षक या दिग्गज अभिनेत्याला कधीही विसरू शकत नाही. सुनील दत्त त्यांच्या वेगवेगळ्या जॉनरच्या सिनेमांतील त्यांच्या भूमिकांसाठी ओळखले जायचे.

जेव्हाही कोणत्या सिनेमाची कथा लिहिली जाते, तेव्हा त्यात अनेक कलाकाराचा भरणा असलेला पाहायला मिळतो. त्या कथेत पात्र बसवली जातात. आजकाल मल्टीस्टारर सिनेमांचं युग सुरू असताना ६०च्या दशकात सुनील दत्त यांनी ‘यादें’ या सिनेमाच्या माध्यमातून एवढा जबरदस्त प्रयोग केला की, या सिनेमाला राष्ट्रीय स्तरावर सन्मान तर मिळालाच, पण या सिनेमाने एक जागतिक विक्रमही केला.

सुनील दत्त यांनीच या सिनेमाची निर्मिती, दिग्दर्शनच नाही, तर अभिनयासोबतच नर्गिससह या सिनेमाची कथाही तयार केली. हा संपूर्ण सिनेमा सुनील दत्त यांचा अप्रतिम अभिनय सर्वांसमोर दाखवतो. सिनेमात नर्गिसचा वापर फक्त चित्र आणि काळी सावली म्हणून करण्यात आला होता. दत्त नर्गिसच्या चित्राच्या मदतीनेच सुनील दत्त संपूर्ण सिनेमा जगले होते.

तर हा सिनेमा होता ब्लॅक अँड व्हाईट. सिनेमाची सुरुवात होते, वेगाचं वादळ, पाऊस आणि एका घरात वाजणाऱ्या फोनच्या घंटीने. घरात एकदम सन्नाटा होता, तेव्हाच एन्ट्री होते अनिलची म्हणजेच सुनील दत्त यांची. सिनेमात कॅरेक्टरचे नाव आहेत, पण जिवंत असे एकही पात्र दिसत नाही. अनिल पूर्ण घर पालतं घालतो, पण त्याला कुणीच दिसत नाही. तो सर्वांची नावे पुकारतो, पण कोणीच उत्तर देत नाही. तेव्हाच फोनची घंटी वाजते. तिकडून आवाज येतो कुलदीपचा. कुलदीप म्हणजे अनिलचा मित्र. तो लग्नाचे आमंत्रण देतो. त्याच्याकडून प्रॉमिसही घेतो की, अनिलने आपल्या पत्नी आणि मुलांसोबत त्याच्या लग्नात यावे. सिनेमाची कहाणी पुढे जाते. तेव्हाच एक ट्विस्ट येतो, जेव्हा फोन आणखी एकदा वाजतो. अनिल फोन उचलून दुसरीकडे असलेल्या महिलेला म्हणतो की, माझ्या घरी फोन करत जाऊ नको. माझ्या पत्नीला संशय येतो. अजूनही भांडण सुरू आहे.

आता अनिलच्या बोलण्यावरून असे दिसते की, त्याचे कुठेतरी विवाहबाह्य संबंध आहेत. याच कारणावरून त्यांच्यात काहीतरी खटकतं. यानंतर पत्नी नर्गिस उर्फ ​​प्रियाचा फोटो पाहून तो तिच्याशी प्रेमाने बोलतो. दरम्यान, अनिलच्या अफेअरवरून दोघांमध्ये भांडण झाल्याचे ते दिवस त्याला आठवतात. बायकोने त्याच्यावर बाहेरच्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला, तर अनिलने तिच्या चारित्र्यावरही चिखलफेक केली. मग तो स्वप्नातून जागा होतो आणि प्रियाला शिव्याशाप देऊ लागतो.

यानंतर अनिल दिवसभर एकटा कसा वेळ घालवतो. त्याला त्याची बायको आणि मुलांची आठवण येते. त्याच्या आठवणीत तो मरत असतो. मग तो आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो. यानंतर सिनेमात काय होते, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण सिनेमा पाहावा लागेल. थोडक्यात, हा सिनेमा पती- पत्नीच्या नात्याबद्दल आहे, जे दररोज भांडतात आणि नंतर आनंदाने एकत्र राहतात.

आता या सिनेमात चांगलं पाहण्यासारखं काय आहे? याबद्दल जाणून घेऊ. सिनेमातील लय भारी काही असेल, तर ते म्हणजे सुनील दत्त यांचे हावभाव. एखाद्या गोष्टीवर हसणे आणि अचानक रागावण्यापासून ते चावीने चालवलेले खेळणे पाहून घाबरण्यापर्यंतचे प्रत्येक हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसतात. त्यांनी प्रत्येक हावभाव अतिशय गांभीर्याने केले. सुनील दत्त यांनी या सिनेमात काल्पनिक हावभावांचा उत्तम प्रयोग केला आहे. हा सिनेमा एक अनोखा प्रयत्न होता आणि आपल्या काळाच्याही पुढचा होता.

पत्नी आणि मुलांसाठी काळजी करणारा प्रेमळ पती म्हणून सुनील दत्त यांनी बजावलेली भूमिका म्हणजे कौतुकास्पदच. सिनेमातील दुसऱ्या पात्राची उपस्थिती दाखवण्यासाठी वापरलेले घटकही अतिशय शानदार आहेत. प्रत्येक सीन खूप छान शूट करण्यात आलाय. पोलिसांना फोन करून गप्प बसणे आणि घाबरणे. किचनमध्ये काहीतरी खायला बनवताना अचानक राग येणे. या क्लासिक सिनेमात सर्वकाही परफेक्ट केलं होतं. सुमारे अडीच तासांचा हा सिनेमा तुम्हाला कुठेही कंटाळवाणा वाटत नाही.

सुनील दत्त यांनी या सिनेमात आपल्या प्रेक्षकांना व्हिज्युअल एक्सप्रेशनचे दुसरे रूप दाखवण्याचा प्रयत्न केलाय, ज्याला सिल्हूट म्हणतात. ही अशी कला आहे, ज्यामध्ये विशिष्ट व्यक्तिमत्त्वाचे चित्रण करण्यासाठी काळ्या सावलीचा वापर केला जातो.

नक्कीच सुनील दत्त यांचा ‘यादें’ हा सिनेमा काळाच्याही पुढचा होता. शिवाय एकट्यानेच सिनेमात अभिनय करणे, त्याचे डिरेक्शनही करणे आणि प्रोड्युसही करणे नक्कीच कमालीची बाब होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
घाणेरडा शर्ट आणि फाटलेली जीन्स घालून रस्त्यावर सिगारेट विकणारा पोरगा कसा बनला सुपरस्टार?
दोस्तांचा दोस्त असणाऱ्या पठ्ठ्याने ‘किंग खान’च्या दोन हिरोईनी पळवलेल्या, कशा ते घ्या जाणून
आधी अभिनेत्रींना डेट करणाऱ्या ‘या’ सुपरस्टार्सना शेवटी सामान्य मुलीशी थाटावा लागला संसार

हे देखील वाचा