Saturday, May 31, 2025
Home साऊथ सिनेमा देशविरोधी वक्तव्य केल्याबद्दल मल्याळम टीव्ही स्टारविरुद्ध तक्रार दाखल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

देशविरोधी वक्तव्य केल्याबद्दल मल्याळम टीव्ही स्टारविरुद्ध तक्रार दाखल, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मल्याळम टीव्ही स्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अखिल मरार अडचणीत सापडला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये देशविरोधी टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली अखिलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केरळ पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. ज्याची माहिती पोलिसांनीच दिली आहे.

याबाबत माहिती देताना कोट्टारक्कारा पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अखिल मरारविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जो अजामीनपात्र आहे. कलम १५२ भारताच्या सार्वभौमत्वाला, एकतेला आणि अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या विधानांशी किंवा कृतींशी संबंधित आहे.

कोट्टारक्करा येथील भाजपचे स्थानिक नेते अनिश किझक्केकरा यांच्या तक्रारीच्या आधारे टीव्ही स्टारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीत, भाजप नेत्याने आरोप केला आहे की अखिल मरारचा ऑनलाइन शेअर केलेला व्हिडिओमध्ये देशाविरुद्ध विधाने आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देशविरोधी विधाने केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करावा.

तक्रार दाखल केल्यानंतर आता पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, व्हिडिओ काढून टाकण्यात आला असल्याने, पुढील कारवाई करण्यापूर्वी, व्हिडिओ परत मिळवला जाईल आणि ते कळल्यानंतरच कोणतीही कारवाई केली जाईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

उर्फीचे स्वप्न भंगले, या कारणामुळे अभिनेत्री २०२५ च्या कान्सला जाऊ शकणार नाही
जाहिराती बघायच्या नसतील तर ७०० रुपये शिल्लक भरा; अमेझॉन प्राइमने काढले नवे नियम… 

हे देखील वाचा