Tuesday, May 21, 2024

दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता थलपथी विजयविरोधात तक्रार दाखल, काय आहे संपुर्ण प्रकरण? लगेच वाचा

अभिनेता थलपथी विजय याच्या आगामी ‘लिओ’ चित्रपटातील ‘ना रेडी’ या गाण्यावरून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘ना रेडी’ गाण्याचा व्हिडिओ अजून रिलीज व्हायचा आहे, पण काही दिवसांपूर्वी एक म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला होता, ज्यावरून चेन्नईस्थित एका कार्यकर्त्याने अभिनेत्याच्या विरोधात ड्रग्ज आणि अल्कोहोलचा वापर केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. यासाेबतच कार्यकर्तेने चित्रपटावर बंदी घालण्याचीही मागणी केली आहे.

विजय, त्रिशा कृष्णन आणि संजय दत्त अभिनीत ‘लिओ’ चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले आहे. ‘ना रेडी’ हे गाणे विजय आणि अनिरुद्ध यांनी गायले आहे, यासाेबतच त्यांनी संगीतही दिले आहे. माध्यमातील वृत्तानुसार, रविवारी (25 जुन)ला चेन्नईस्थित आरटीआय सेल्वम यांनी चेन्नई पोलीस आयुक्तांकडे चित्रपटाविरुद्ध ऑनलाइन तक्रार दाखल केली आणि विजयविरुद्ध नार्कोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सब्सटेंस कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. विजय गाण्याच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या सेवनाचा गौरव करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

‘ना रेडी’च्या म्युझिक व्हिडिओमध्ये चित्रपटातील काही फाेटाे आणि झलक दाखविण्यात आली आहे, ज्यामध्ये विजय तोंडात सिगारेट घेऊन आणि बॅकअप नंतर बिअरचे मग हातात धरून नाचताना दिसत आहेत. गाण्याचे बोल देखील दारूबद्दल आहेत. विशेष म्हणजे सेल्वम यांनी दिग्दर्शक लोकेशचा मागील चित्रपट ‘विक्रम’ विरोधातही अशीच तक्रार केली होती, ज्यामध्ये कमल हसनने भूमिका साकारली हाेती.

‘ना रेडी’चा व्हिडिओ लवकरच प्रदर्शित होणार आहे. अशात सेल्वम यांच्या आरोपांवर चित्रपटाच्या टीमने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. हा चित्रपट 19 ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे आणि हा या वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षित तमिळ चित्रपटांपैकी एक आहे.(complaint lodged against actor thalapathy vijay over leo song naa ready demand to ban the film)

अधिक वाचा-
अर्जून कपूरचा वाढदिवस, कथित बॉयफ्रेंडच्या बर्थडे पार्टीत 49 वर्षीय मलायकाचे जोरदार ठुमके, व्हिडिओ व्हायरल

रामानंद सागर यांच्या पणतीवर लैगिंक अत्याचार? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा