Tuesday, May 28, 2024

अर्जून कपूरचा वाढदिवस, कथित बॉयफ्रेंडच्या बर्थडे पार्टीत 49 वर्षीय मलायकाचे जोरदार ठुमके, व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आज 26 जून 2023 रोजी त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी अर्जुन कपूरच्या घरी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरा, अंशुला कपूरशिवाय अनेक स्टार्सनी हजेरी लावली. अशात पार्टीदरम्यानचा मलायका अराेराचा एक डान्स व्हिडिओ समाेर आला आहे, जाे साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये मलायका अराेरा (malaika arora) ‘दिल से’ मधील’छैय्या छैय्या’ या आयकॉनिक गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्रीने चमकदार पांढऱ्या आणि लाल गाऊनमध्ये तिच्या किलर मूव्हज फ्लाॅंट करताना दिसली. अशात अभिनेत्रीच्या या डान्सने अर्जुन कपूरच्या पार्टीला चार चांद लावले आहेत. दुसरीकडे, मलायकचा हा डान्सिंग व्हिडिओ साेशल मीडियावर चांगलाच व्हायरल हाेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

एका मुलाखतीदरम्यान मलायका म्हणाली हाेती की, “लोकांनी ते गाणे नाकारले आणि ही गाेष्ट माझ्यासाठी फायदेशीर ठरली. मी खूप लकी आहे आणि माझा नशीबावर विश्वास आहे. मला असे वाटते की, हे घडणे निश्चितच होते. फराह खान, शाहरुख खान, मणिरत्नम, एआर रहमान ते संतोष सिवानपर्यंत सर्वोत्कृष्ट कलाकारांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली.  25 वर्षांनंतरही, मोठ्या पडद्यावर जबरदस्त प्रभाव पाडणाऱ्या कोणत्याही गाण्याचा विचार केला, तर प्रत्येकजण म्हणतो ‘छैय्या छैय्या’ हे त्यापैकी एक गाणे आहे. आजही लोक ते गाणे गातात आणि नाचतात. मला अजूनही त्या गाण्यावर प्रेम आहे. त्यामुळे अशा ब्लॉकबस्टर गाण्याचा भाग बनण्याची संधी मला मिळाली याचा मला खूप आनंद आहे.”

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या लग्नाच्या बातम्या अनेकदा मीडियात येत असतात. मात्र, या जोडप्याने लग्नाशी संबंधित सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. अभिनेत्याच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर अर्जुन कपुर ‘द लेडीकिलर’मध्ये भूमि पेडणेकरसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (bollywood dancer malaika arora sets arjun kapoor birthday party on fire with her dance on chaiyya chaiyya)

अधिक वाचा- 
बिग बॉसच्या घरातून ‘ही’ स्पर्धक पडली बाहेर? एलिमिनेशननंतर अभिनेत्री झाली भावूक
जुळ्या मुलांची नाव ‘पठाण’ आणि ‘जवान’ ठेवणार शाहरूखची फॅन; अभिनेता म्हणाला,’ प्लिज त्यांना आणखी..’ 

हे देखील वाचा