Monday, May 13, 2024

‘शासनामध्ये कोणत्याच धर्माला स्थान नसले पाहिजे,’ म्हणत संगितकार विशाल ददलानीने केजरीवालवर केली टीका

बॉलिवूड इंडस्ट्रीचे लोकप्रिय संगितकार विशाल ददलानी याने अनेक चित्रपटामध्ये आपल्या गाण्यांनी तडका लावला आहे. याने खूप गाजणारे गाणे गाऊन चाहत्यांवर आपली छाप सोडली आहे. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असून त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. तो सध्या टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘इंडियन आयडल’चे परिक्षक म्हणून काम करत आहे. यावेळेस विशाल आपल्या गाण्यामुळे नाही, तर सोशल मीडिया पोस्टमुळे खूपच चर्चेत आला आहे.

प्रसिद्ध संगितकार विशाल ददलानी (Vishal Dadlani) याने नुकतंच एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत त्याने आम आदमी जनता पार्टीचे (Aam Aadmi Party) आध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvid kejriwal) यांच्यार निशाना साधला आहे. त्याने पोस्ट शेअर करत अरविंद यांच्यावर टीका केली आहे. बुधवार ( दि. 26 ऑक्टोंबर) दिवशी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय मुद्रावर माता लक्ष्मी आणि गणेश देवाचा फोटो लावण्याची मागणी केली, आणि सांगितले की, असे केल्यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल. यावर विशाल ददलानीने नाव न घेता मुख्यमंत्र्याच्या मागनीवर टीका केली आहे.

संगितकार विशाल याने ट्वीटरवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “भारताचे संविधान सांगत आहे की, आपण धर्मनिरपेक्ष समाजवादी गणराज्य आहेत. त्यामुळे शासनामध्ये कोणत्याच धर्माला स्थान नसले पाहिजे. मी स्पष्ट सांगत आहे की, या सगळ्यामध्ये माझे कोणत्याच व्यक्तीशी घेणं देणं नाही, जे धर्माच्या कोणत्याही भागाला सरकारच्या कोणत्याही भागामध्ये आणतात. जय हिंद!” हे ट्वीट शेअर केल्यांनतर नेटकऱ्यांनी असा अंदाज लावला आहे की, ही पोस्ट अरविंद केजरीवल यांच्यावर टीका करत केली आहे, कारण त्याने केजरीवलच्या वक्तव्यानंतर काही तासांनी ही पोस्ट शेअर केली होती.

बुधवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला आग्रहाची मागणी केली होती की, “आम्हाला सगळ्यांना हेच पाहिजे आहे की, भारत विकसित देशासोबत समृद्ध देशही बनावा, प्रत्येक कुटुंबाने समृद्ध कुटुंब व्हावे अशी आमची इच्छा आहे. यासाठी बरीच पावले उचलावी लागतील. मी केंद्र सरकारला आवाहन करतो, पंतप्रधानांना आवाहन करतो की, आपल्या चलनावर गांधीजींच्या चित्रासोबत लक्ष्मी-गणेशजींचाही फोटो असावा.”

केजरीवलने पुढे सांगितले की, “असे केल्याने पुर्ण देशाला त्यांचा आशिर्वाद मिळेल. लक्ष्मी देवीला धनाची देवी मानत आहेत, आणि गणेश सगळ्या दु:खांना लांब करत आहे. त्यामुळे या दोन देवतांचे फोटो नेटांवर छापले पाहिजे.” त्याशिवाय अरविंद केजरीवालने इंडोनेशियाचे उदाहरण देत सांगितले की, “तो एक मुस्लिम देश आहे. येथे 85 टक्क्यांहून अधिक मुस्लिम असून हिंदूंची संख्या केवळ 2 टक्के आहे. असे असूनही त्यांनी आपल्या नोटेवर गणेशजींचा फोटो छापला आहे, त्यामुळे मला वाटते की ही एक अतिशय महत्त्वाची पायरी आहे.”

केजरवाले असे पत्रकार परिषजेत सांगितल्यानंतर विशाल ददलानीने काही तासानंतर आपल्या ट्वीटर अकाउंटवरु न ट्वीव शेअर करुन नाव न घेता थेट केजरीवालच्या मागणीवर टीका व्यक्त केली आहे, असे चाहत्यांना वाटत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खुशखबर! मोठ्या ब्रेक नंतर पॉप सिंगर रिहाना पुन्हा एकदा मैदानात
पाहिलात का? उर्फी जावेदचा नवीन ड्रेस, गाणे ऐकत सुचली कल्पना अन्

 

हे देखील वाचा