Monday, July 15, 2024

खुशखबर! मोठ्या ब्रेक नंतर पॉप सिंगर रिहाना पुन्हा एकदा मैदानात

लोकप्रिय चित्रपट ‘ब्लॅक पॅंथर’ याने आपल्या चाहत्यांना काही दिवसांपूर्वीच खुशखबर दिली होती की, लवकरच ‘ब्लॅक पॅंथरचा2’ घेऊन येणार आहेत. आता मात्र, अजून एक आनंदाची बातमी समोर येत आहे की, अनेक दिवसांपासून आपल्या संगिताने लोकांचे मनोरंजन करणारी प्रसिद्ध गायक पॉप सिंगर मोठ्या ब्रेकनंतर रिहाना पुन्हा एकदा संगीत क्षेत्रामध्ये उतरली आहे. ती लवकरच आपल्या नवीन गाण्यसोबत चाहत्यांशी भेटणार आहे.

मार्व्हल आधिच आपल्या चाहत्यांसठी ‘ब्लॅक पॅंथर2’ ची घोषणा करुन सगळ्यांना खुश केले होते मात्र, या सोबत अजून एक आनंदाची बतमी आहे की, पॉप सिंगर रिहाना (Rihanna) ही आपल्या नवीन गाण्यासोबत पुन्हा एकदा नवीन सुरुवात करत आहे. ती अनेक दिवसांपासून इंडस्ट्रीपासून लांब होती, आता ती ‘ब्लैक पैंथर वकांडा फॉरएवर’ या चित्रपटामधून झळकणार आहे.

रिहाना मार्व्हल ही ब्लॉकबास्टर सीक्वल ब्लॅक पॅंथर:वकांडा फॉरएवर या चित्रपटामध्ये ‘लिफ्ट मी अप’ गाण्यापासून संगित क्षेत्रामध्ये परत येत आहे. हे गीत चॅडविक बोसमन (Chadwick Boseman) याच्या जीवन आणि वारसाला श्रद्धांजली म्हणून हे गाणे लिहिले आहे. या गाण्याला चित्रपटाअगोदर ( दि.28 ऑक्टोंर) दिवशी प्रदर्शित केले जाइल. गायिका रिहाना हिने आपल्या नवीन गाण्यची एक झलक आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंवरुन शेअर केली आहे.

‘ब्लॅक पॅंथर2’ हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झालेला ‘ब्लॅक पॅंथर: वकांडा फॉरएवर’ याचा दुसरा भाग आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेयान कूगलर (Ryan Coogler) यांनी केले असून या चित्रपटाला ऑस्कर नामांकणामध्ये बेस्ट फिल्मच्या यादीमध्ये नॉमिनेट केले होते. रेयान यांनी ‘पॅंथर’ स्टार चॅडविक बोसमेनसाठीच या चित्रपटाचा सिक्वल लिहिला होता, मात्र 2020 मध्ये कोलन कॅन्सरला झुंज दिल्यानंतर त्यांचा मृत्यु झाला. यानंतर बोसमेनच्या वारसाचा सन्मान करत दिग्दर्शकाने या गोष्टीला त्याचप्रकारे पुढे घेऊन गेले आहेत. ‘ब्लॅक पॅंथर2’ चित्रपटाद्वारे चॅडविक बोसमेन याला श्रद्धांजली देखिल देण्यात आली. अ‍ॅक्शन अ‍ॅडवेंचर ‘ब्लॅक पॅंथर2’ हा चित्रपट 11 नेव्हेंबर, 2022 साली चित्रपगृहामध्ये इंग्रजी, हिंदी, तामिळ, आणि तेलुगू भाषामध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पाहिलात का? उर्फी जावेदचा नवीन ड्रेस, गाणे ऐकत सुचली कल्पना अन्…
कॉमेडियन सुदेश लहरीचा जीवन प्रवास, इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी केला होता ‘या’ कठीण परिस्थितीचा सामना

हे देखील वाचा