चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकणारी स्वरा भास्कर (Swara Bhasker) खऱ्या आयुष्यातही तिच्या बोल्ड वक्तव्यासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. स्वरा नेहमीच चर्चेचा विषय बनत असते. आपल्या हटके स्टाईलमुळे चर्चेत राहणारी स्वरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलिकडेच अभिनेत्रीने खुलासा केला होता की, तिला एक मूल दत्तक घ्यायचे आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, अभिनेत्रीने सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी (सीएआरए) प्रोस्पेक्टिव अडॉप्टिव पेरेंट (पीएपी) म्हणून तिचे नाव नोंदवले आहे.
त्याचवेळी, आता अभिनेत्री तिच्या निर्णयाबद्दल आणि त्याच्या प्रक्रियेबद्दल उघडपणे बोलली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले की, “मुलाला दत्तक घेण्याच्या माझ्या निर्णयानंतर लोकांना काळजी वाटते की, माझ्याशी कोण लग्न करेल.” स्वरा म्हणाली की, “हा या टप्प्याचा प्रारंभिक भाग आहे, कारण त्याची प्रक्रिया खूप लांब आहे. यासाठी तुम्हाला बराच काळ वाट पाहावी लागेल.” ती पुढे म्हणाली, “मला वाटते हे देखील खूप महत्वाचे आहे, कारण राज्य आणि सीएआरए अतिशय काळजीपूर्वक ठरवतात की, ज्या पालकांकडे मुलाला सोपवले जात आहे, ते त्याची काळजी घेतील की, नाही.”
यादरम्यान स्वराने असेही सांगितले की, तिने मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतल्यापासून लोक तिला विचित्र प्रश्न विचारत आहेत. तिने सांगितले की, लोक तिला विचारत आहेत की, “अरे, आता तू लग्न करणार नाहीस की, तुझ्याशी कोण लग्न करेल. पण माझे आई-वडील, भाऊ, वहिनी आणि जवळचे मित्र माझ्या निर्णयाचा आदर करतात आणि समर्थन करतात, जे माझ्यासाठी पुरेसे आहे.”
यापूर्वी रवीना टंडन आणि सुष्मिता सेन यांनीही अविवाहित असताना मुले दत्तक घेतली होती. अभिनेत्री म्हणाली की, “मला माहित आहे की सिंगल मदर असणे हे एक मोठे पाऊल आहे.” खरं तर, मूल दत्तक घेतल्याची बातमी समोर येताच अभिनेत्रीची तुलना अभिनेत्री सुष्मिता सेन आणि रवीना टंडनशी करण्यात आली.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्री शेवटची ‘रासभरी’, ‘भाग बीनी भाग’ यासह अनेक ओटीटी सीरिजमध्ये दिसली होती. सध्या ती अभिनेत्री तिच्या आगामी मर्डर मिस्ट्री ‘मिमांसा’मध्ये पुन्हा एकदा तपास अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अनेक वर्षांपूर्वीच झाली होती ‘ओमिक्रॉन व्हेरिएंट’ची भविष्यवाणी! व्हायरल होतोय चित्रपटाचा पोस्टर










