Monday, July 1, 2024

बॉलिवूडमध्ये कोरोनाचे थैमान अनेक बड्या कलाकरांना झाली कोरोनाची लागण, जाणून घ्या कोणाकोणाचा आहे यात समावेश

मागील दोन वर्षांपासून संपूर्ण जग एका न दिसणाऱ्या विषाणूशी कोरोनाशी लढत आहे. या कोरोनाने संपूर्ण जगाला वेढीस धरले असून, मधेच कोरोनाचा प्रभाव कमी तर मधेच वाढताना दिसत आहे. आता कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. देशात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत अनेकांना करोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळते. दररोजची येणारी आकडेवारी देखील वाढताना दिसत असून, बॉलिवूडमधील अनेक कलाकार करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. मलायका अरोराची बहीण अमृता अरोरा, करिना कपूर, सीमा खान, महिप कपूर यांना करोनाची लागण झाली होती. मात्र आता या यादीत अधिक कलाकारांची भर पडताना दिसत आहे. रोज नवनवीन कलाकार कोरोना संक्रमित होताना दिसत आहे.

आता अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल यांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः त्यानेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना जॉनने लिहिले, “३ दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो. त्यानंतर मला समजले की, ती व्यक्ती करोना पॉझिटिव्ह होती. आता मला आणि माझी पत्नी प्रियाला करोनाची लागण झाली आहे. आम्ही दोघे आमच्या घरीच क्वारंटाइन झाले आहोत. आमच्या दोघांचेही कोरोनाचे दोन्ही डोस घेऊन लसीकरण झाले होते. आम्हाला करोनाची सौम्य लक्षण दिसत आहेत. कृपया सर्वांना काळजी घ्या. सुरक्षित राहा आणि मास्कचा वापर करा.”

जॉन नंतर डेली सोप क्वीन असणाऱ्या एकता कपूरला देखील कोरोनाने ग्रासले आहे. एकताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत ती पॉझिटिव्ह झाली असल्याचे सांगितले आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की. “सर्व काळजी घेऊनही माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्बेत ठिक आहे, माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी करोना चाचणी करुन घ्या.” एकताने स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे.

बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा देखील पॉझिटिव्ह असल्याचे समजत आहे. त्या दोघांनाही लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दिग्दर्शक राहुल रवैल हे देखील कोरोनाने संक्रमित झाले आहे. याव्यतिरिक्त नोरा फतेही, मृणाल ठाकूर, अर्जुन कपूर, रणवीर शौरीचा मुलगा, अर्जुन कपूर त्याची बहीण अंशुला कपूर तसेच टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहताच्या ११ महिन्यांच्या मुलाला आणि पत्नीला देखील करोनाची लागण झाली आहे.

हेही वाचा :

आनंद शिंदे यांनी मीरा आणि जय यांना दिली गाण्याची ऑफर, आगामी काळात झळकणार एकत्र

‘भाऊने माझा केसाने गळा कापला असता’, म्हणत कुशल बद्रिकेने शेअर केला भाऊ कदमसोबतचा ‘तो’ किस्सा

अजय देवगणच्या लेकीचे बोल्ड फोटो होतायत इंटरनेटवर व्हायरल, तुम्ही पाहिले का?

हे देखील वाचा