Wednesday, March 4, 2026
Home अन्य कोरोनामुळे अनेक सिनेमांचे प्रदर्शन रखडले, २०२१ मध्ये येणार ‘हे’ बिग बजेट सिनेमे

कोरोनामुळे अनेक सिनेमांचे प्रदर्शन रखडले, २०२१ मध्ये येणार ‘हे’ बिग बजेट सिनेमे

आता आपण २०२०च्या शेवटाकडे जात आहोत खरंतर सर्वांनाच २०२० हे वर्ष कधी संपते असे झाले आहे. कारण २०२० हे वर्ष सामान्य लोकांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनाच त्रासदायक ठरले. कोरोनासारख्या महामारीने भारतासोबतच संपूर्ण विश्वात थैमान घातले, आणि जग थांबले.

भारतातदेखील कोरोनाचा वाढत प्रभाव लक्षात घेऊन सरकारने सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद केली. यामुळे अनेक क्षेत्रांवर याचा परिणाम झाला. बंद करण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये चित्रपटगृहांचा समावेश असल्याने चित्रपटांचे प्रदर्शन थांबले. या लेखातून आपण अशा काही कलाकारांची नावे बघणार आहोत, ज्यांचे सिनेमे प्रदर्शित झाले नाहीत, पण प्रदर्शनासाठी तयार होते.

सलमान खान :

बॉलीवूडचा दबंग खान हा अतिशय लोकप्रिय आहे. त्याचे सर्वच फॅन्स त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट बघत असतात. यावर्षी सलमान खानने त्याच्या ‘ राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी २०२० सालातला ईद चा मुहूर्त साधला होता. मात्र कोरोनामुळे चित्रपटाच्या चित्रीकरणावर आणि प्रदर्शनावर परिणाम झाला आहे. या चित्रपटात सलमान खान सोबत दिशा पटानी, मेघा आकाश, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट आता पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल. 

शाहरुख खान :

२०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ चित्रपटाच्या अपयशानंतर शाहरुख कोणत्याच सिनेमात दिसला नाही. त्याच्या फॅन्सला शाहरुख २०२०मध्ये कोणत्यातरी चित्रपटात दिसेल असे वाटले होते मात्र असे झाले नाही. शाहरुखने सध्या त्याच्या ‘पठाण’ सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. कोरोनमुळे शाहरुखच्या कोणताच सिनेमाची घोषणा झाली नाही की शूटिंगला सुरुवात झाली नाही. मात्र अनलॉक नंतर शाहरुखने ‘पठाण’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. या सिनेमाची औपचारिक घोषणा लवकरच होऊ शकते.

अक्षय कुमार :

अक्षय कुमार आणि कतरीना कैफ यांची मुख्य भूमिका असणारा ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा याचवर्षी मार्च मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आणि हा सिनेमा आता २०२१ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी आणि फॅन्सने ट्रेलरला भरभरून दाद दिली.

आमिर खान :

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून आमिरची ओळख आहे. यावर्षी आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा नावाची सिनेमा प्रदर्शित होणार होता, पण कोरोनामुळे थांबलेल्या शूटिंग नी ‘लाल सिंग चढाच्या शूटिंगवर परिणाम झाला. अंतर आता पुन्हा या सिनेमाचे शूटिंग सुरु झाले आहेत. हा सिनेमा येत्या २०२१ मध्ये प्रदर्शित होईल.

रणवीर सिंग :

कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ हा सिनेमा २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता. पण चित्रपटगृहाच्या बंद असण्यामुळे आता हा सिनेमा २०२१ मध्ये प्रदर्शित होईल.

शाहिद कपूर :

शाहिदच्या ‘जर्सी’ सिनेमा यावर्षी प्रदर्शित होणार होता. मात्र हा सिनेमा आता पुढच्या वर्षीच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

हे देखील वाचा