Friday, July 5, 2024

‘सूर्यवंशी’ चित्रपटात दिसणार महेंद्रसिंग धोनी? गुलशन ग्रोव्हर यांनी दिला इशारा

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि रणवीर सिंग याचाही मोठा कॅमिओ आहे. रोहित शेट्टीच्या या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा होत आहे. कारण हा चित्रपट जवळपास अडीच वर्षे प्रदर्शनासाठी थांबला होता आणि निर्माते आता थेट ५ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित करत आहेत. आता या चित्रपटाशी संबंधित आणखी एक मजेशीर बाब समोर आली आहे. यात महेंद्रसिंग धोनी दिसणार असल्याचे माहिती समोर येत आहे.

कल्पना करा की, धोनी अक्षय कुमारसोबत स्क्रीनवर दिसत आहे आणि तोही रोहित शेट्टीच्या चित्रपटात. अलीकडेच ‘बॅड मॅन’ गुलशन ग्रोव्हर यांनी सोशल मीडियावर ‘सूर्यवंशी’मध्ये धोनीच्या उपस्थितीकडे निर्देश करणारा एक फोटो शेअर केला आहे.

चित्रपट की, जाहिरात शूट करत आहे धोनी?
या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये गुलशन ग्रोव्हर यांनी चाहत्यांना अंदाज दिला आहे की, “‘सूर्यवंशी’च्या सेटवर माही भाईसोबत. काय? अक्षय धोनीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटात काम करत आहे किंवा त्याच स्टुडिओमध्ये काहीतरी शूटिंग करत आहे.” असे दिसते की, धोनी त्याच स्टुडिओमध्ये शूटिंग करत होता. जिथे अक्षयचा ‘सूर्यवंशी’ शूट केला जात होता आणि भारतीय क्रिकेटरने बॉलिवूडच्या बॅड मॅनसोबत फोटो सेशनसाठी पोझ दिली होती.

बॅडमॅनला वाटत होती धोनीची भीती
गुलशन यांच्या भूतकाळात कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या एमएस धोनीमुळे तणावाखाली आले होते. कारण धोनीची फॉक्स हेअरस्टाईल होते. प्रत्येकजण धोनीच्या नवीन कूल लूकचा आनंद घेत असताना गुलशन थोडे घाबरले होते. धोनीला टॅग करत गुलशन यांनी लिहिले की, “माही भाई छान दिसत आहे! कृपया कोणत्याही डॉनची भूमिका स्वीकारू नका, हे माझ्या धंद्याला लाथ मारेल… आधीच माझे ३ सर्वात प्रिय भाऊ संजय दत्त, सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ मला या व्यवसायातून बाहेर काढण्यासाठी हे करत आहेत. अलीम बॅडमॅन येत आहे.”

धोनी सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ मध्ये टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून काम करत आहे. अलीकडेच, भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने धोनी आणि इंग्लंडचा पांढऱ्या चेंडूचा कर्णधार इऑन मॉर्गन यांच्यात साम्य दाखवले होते. इंग्लंडने श्रीलंकेवर विजय मिळविल्यानंतर त्याने सांगितले की, इंग्लंड संघासाठी मॉर्गनची व्हॅल्यू जितकी धोनीचे आहे, तितकीच व्हॅल्यू टीम इंडियासाठी आहे.

मेगा इव्हेंटमध्ये टीम इंडियाची आतापर्यंत सुखद कामगिरी झालेली नाही. या संघाने आतापर्यंत तीनपैकी पहिले दोन सामने गमावले असून, निराशाजनक कामगिरीसाठी संघावर जोरदार टीका होत आहे. पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा ८ गडी राखून पराभव केला. मात्र, तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दमदार पुनरागमन केले. त्यांनी अफगाणिस्तानचा ६६ धावांनी पराभव केला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-महेंद्रसिंग धोनी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? चाहत्यांच्या इच्छेवर क्रिकेटपटूने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

-अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ घालणार मोठ्या पडद्यावर धुमाकूळ! १०० टक्के क्षमतेने सुरू झाली चित्रपटगृहे

-‘सूर्यवंशी’ चित्रपटातील नवीन गाणं रिलीझ, ११ वर्षांनी पाहायला मिळाला कॅटरिना आणि अक्षयचा रोमँटिक अंदाज

हे देखील वाचा