Friday, March 29, 2024

महेंद्रसिंग धोनी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? चाहत्यांच्या इच्छेवर क्रिकेटपटूने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळत आहे. क्रिकेट व्यतिरिक्त, धोनी जाहिरातींमध्येही खूप दिसतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आयपीएल २०२१ च्या जाहिरातीत धोनीची शानदार स्टाईल पाहायला मिळाली. धोनी आता क्रिकेटनंतर बॉलिवूड विश्वात पाऊल ठेवणार असल्याचे म्हटले जात आहे.

धोनीचा बायोपिक बनवण्यात आला आहे, ज्यामध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतने त्याची भूमिका साकारली होती. धोनीने त्याच्या बायोपिकमध्ये स्वतःचे पात्र साकारावे, अशी मागणी त्यावेळी अनेक चाहते करत होते. पण क्रिकेटपटूला स्वत:ला दीर्घ काळासाठी कॅमेऱ्यासमोर ठेवणे खूप कठीण असते, असे धोनीलाही वाटते. माध्यमांतील वृत्तानुसार धोनी म्हणतो की, तो निवृत्तीनंतर बॉलिवूडमध्ये येण्याचा विचार करत नाही, कारण त्याला वाटते की, अभिनय करणे सोपे नाही.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याबाबत काय म्हणाला धोनी?
माध्यमांतील वृत्तानुसार, धोनी म्हणाला की, “तुम्हाला माहित आहे की, बॉलिवूडमध्ये पदार्पण करणे खरोखर माझ्याकडून होणार नाही. जाहिरातींबद्दल बोलायचं झालं, तर मी ते करण्यात खूप आनंदी आहे. जेव्हा चित्रपटांचा प्रश्न येतो तेव्हा मला वाटते की, हा एक अतिशय कठीण व्यवसाय आहे आणि खूप कठीण काम आहे. मी ते चित्रपट कलाकारांवर सोपवतो, कारण ते खरोखरच चांगले आहेत. मी क्रिकेटशी जोडलेला आहे. मी फक्त जाहिरातींद्वारे अभिनयाच्या जवळ येऊ शकतो, पण त्यापेक्षा जास्त नाही.”

खूप कमी लोकांना माहित आहे की, धोनीने बॉलिवूड चित्रपटात कॅमिओ केला होता, पण त्याचा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. हा चित्रपट डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘हुक या क्रूक’ होता. या चित्रपटात जॉन अब्राहम आणि श्रेयस तळपदे सारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे शूटिंग २०१० मध्ये सुरू झाले. या चित्रपटाची कथा एका मुलाची होती ज्याचे स्वप्न भारतीय क्रिकेट संघात सामील होण्याचे आहे. या चित्रपटात धोनीने एक कॅमिओ केला होता, परंतु काही कारणामुळे चित्रपट पूर्ण होऊ शकले नाही आणि कोल्ड स्टोरेजमध्ये गेला.

नुकतेच हरभजन सिंग आणि इरफान पठाण सारख्या क्रिकेटपटूंनी निवृत्तीनंतर चित्रपटात पदार्पण केले आहे. हरभजन सिंगचा चित्रपट ‘फ्रेंडशिप’ गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. त्याचबरोबर इरफान पठाणही ‘कोब्रा’ चित्रपटात दिसला. या दोन खेळाडूंपुढे विनोद कांबळी, अजय जडेजा आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेटली देखील चित्रपटांमध्ये दिसले आहेत. अशा परिस्थितीत धोनीचे चाहतेही त्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडला ‘राम राम’ ठोकल्यानंतर, ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमने प्रथमच शेअर केला तिचा फोटो

-शूटिंगच्या पहिल्याच दिवशी संजय मिश्रा यांनी दिले होते २८ टेक, अखेर कंटाळून दिग्दर्शकाने केलं ‘हे’ काम

-‘कसं काय पावनं बरं हाय का?’ मृण्मयीने शेअर केला आदिनाथसोबतचा दिलखेचक फोटो

हे देखील वाचा