Friday, July 5, 2024

क्रिकेटनंतर आता मनोरंजनाच्याही मैदानावर उतरतोय धोनी, चित्रपटाचे मोशन पोस्टर आऊट

क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी याने मैदानावर चौकार आणि षटकार मारून सर्वांनाच आश्चर्य  चकीत केले. आजही त्याचे चाहते क्रिकेटच्या मैदानावर त्याचा खेळ खूप मिस करतात. एमएस धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून चाहत्यांना त्याच्याशी संबंधित बातम्या क्वचितच ऐकायला मिळतात. अशातच आम्ही तुमच्यासाठी अशी बातमी घेऊन आलाे आहे, जी ऐकल्यानंतर तुमचा आनंद गगनात मावणार नाही. क्रिकेट विश्वावर राज्य केल्यानंतर आता धोनी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला असून अलीकडेच त्याच्या पहिल्या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

एमएस धोनी (ms dhoni) सोशल मीडियावरही फारसा सक्रिय नसतो, परंतु अलीकडेच त्याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर त्याच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली. धोनी अभिनेता म्हणून नव्हे तर निर्माता म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. ‘लेट्स गेट मॅरिड’ असे त्याच्या पहिल्या चित्रपटाचे नाव आहे.

विशेष म्हणजे धोनीने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी तमिळ सिनेमाची निवड केली आहे. धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडने त्याच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. हे एक ऍनिमेटेड पोस्टर आहे, ज्यासह त्याने त्याच्या चित्रपटाच्या टाइटलची घोषणा केली आहे.

हे मोशन पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले की, ‘आम्ही धोनी एंटरटेनमेंटच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा करताना खूप उत्सुक आहोत.

एमएस धोनी निर्मित या चित्रपटात तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते हरीश कल्याण, इवाना, नादिया आणि योगी बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश थमिलामनी करत आहेत. एमएस धोनीच्या डेब्यू चित्रपटाचे पोस्टर समोर येताच चाहत्यांनी आनंदाने उड्या मारल्या आणि एमएस धोनीचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.

कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘माझा राजकुमार, मनापासून तुझे खूप खूप अभिनंदन’. आणखी एका युजरने लिहिले की, ‘हा चित्रपट आधीच ब्लॉकबस्टर आहे’. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘खूप खूप अभिनंदन, आम्ही तुम्हाला मनोरंजन क्षेत्रात यशस्वी हाेण्यासाठी प्रार्थाना करताे.’

या चित्रपटाची स्टारकास्ट पाहिल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. (cricketer ms dhoni debut in entertainment industry with tamil film lets get married directed by ramesh thamilmani)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दु:खद! एनटीआर आणि नागेश्वर राव सारख्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन

नीना गुप्ता यांच्या मुलीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर फोट शेअर करत म्हणाली…

हे देखील वाचा