Tuesday, March 5, 2024

अरे वाह! प्रशांत दामले यांनी 12,500 प्रयोगांचा टप्पा केला पार, सचिनने केले काैतुक

आपल्या अभिनेयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे प्रशांत दामले हे त्याच्या चित्रपटातून आणि नाटकांमधून कायमचे प्रेक्षकांचे मनाेरंजन करत असतात. अलीकडेच प्रशांत दामले यांनी 12 हजार 500 प्रयाेगांचा टप्पा गाठला आहे. या निमित्तानं अनेक कलाकार प्रशांत दामले यांना शुभेच्छा देत आहेत. अशातच क्रिकेटर सचिन तेंडुलकर यानेही प्रशांत दामले यांच्यासाठी ट्विटरवर एक खास पाेस्ट केली आहे. हे पाेस्ट शेअर करत सचिनने प्रशांच यांचे काैतुक केले आहे.

सचिन तेंडुलकर (sachin tendulkar) यांनी ट्विट करत लिहिले की, “मराठी माणसाच्या मनात मराठी रंगभूमीला एक मानाचे स्थान आहे. प्रशांत दामले हे लोकप्रिय कलाकार आज त्यांचा 12500 वा प्रयोग सादर करत आहेत. एक मराठी रसिक म्हणून मला ही अभिमानास्पद गोष्ट वाटते. त्यांच्या या विक्रमी कारकीर्दीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.” असं पाेस्ट करत त्यांनी प्रशांत दामले यांचे काैतुक केले आहेत.

कलाकार प्रशांत दामले यांनी आज (दि. 6 नाेव्हेंबर)ला 12 हजार 500 एक वा प्रयाेग सादर केला. यानिमित्ताने त्यांनी स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान आणि स्मृतिगंधतर्फे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’  या नाटकाचा विनामुल्य प्रवेश ठेवण्यात आला.

नाटकाव्यतिरिक्त परीक्षक आणि सूत्रसंचालनची पार पाडली भूमिका
प्रशांत दामले यांनी 1983 साली ‘टूरटूर’ या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यांनी वेगवेगळ्या नाटकांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आणि मग काय ते एका पाठाेपाठ एक यशाचे शिखर गाठू लागले. प्रशांत दामले यांनी सिनेसृष्टीला ‘नकळत दिसले सारे’, ‘कार्टी काळजात घुसली’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘साखर खाल्लेला माणूस’ आणि ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ असे दमदार नाटक त्यानी प्रेक्षकांसमाेर सादर केले. याव्यतिरिक्त त्यांनी ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमामध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडली हाेती. तसेच त्यांनी ‘आम्ही सारे खवैये’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विराटच्या नादात केएल राहुल विसरला प्रेयसीचा वाढदिवस; म्हणाला,’आपण सर्वकाही चांगले…’

भारती सिंगच नव्हे तर, ‘या’ कलाकारांनीही झिजवली कोर्टाची पायरी, यादी पाहाच

हे देखील वाचा