Friday, May 24, 2024

अभिनेत्री बनण्यासाठी पैसे चोरून सोडले होते घर, असा होता राखी सावंतचा संघर्षमय प्रवास

बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणारी अभिनेत्री, ड्रामा क्वीन आणि डान्सर म्हणजे राखी सावंत होय. मनोरंजन क्षेत्रात तिने तिच्या विनोद बुद्धीने एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. प्रत्येकवेळी ती प्रेक्षकांचे तिच्या डान्सने आणि अभिनयाने मनोरंजन करत असते. एका सामान्य व्यक्तीपासून ते एक नावाजलेली अभिनेत्री असा प्रवास करणे तिच्यासाठी काही सोपे नव्हते. यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. राखी शनिवारी(२५ नोव्हेंबर) तिचा ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर यानिमित्त जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास माहिती.

राखीचा जन्म २५ नोव्हेंबर १९७८ रोजी मुंबई येथे झाला. राखी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. राखीबाबत ही गोष्ट खूप कमी जणांना माहित असेल की, तिचे खरे नाव निरू भेडा हे आहे. परंतु चित्रपटसृष्टीत येण्यासाठी तिने तिचे नाव बदलले. राखीचा जन्म अगदी गरीब कुटुंबात झाला आहे. तिची आई हॉस्पिटलमध्ये आया होती, तर वडील एक पोलीस कॉन्स्टेबल होते. अगदी कठीण परिस्थितीत तिचे बालपण गेले आहे. अनेकवेळा त्यांच्या घरात जेवण देखील नसायचे. बऱ्याचवेळा त्यांच्या शेजारी तिला राहिलेले जेवण द्यायचे ते खाऊन ती झोपायची. (actress rakhi sawant celebrate her birthday, lets know about her life)

राखी सावंतने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, लहानपाणापासूनच तिला डान्स आणि अभिनयाची खूप आवड होती. परंतु तिने डान्स केल्यावर तिचे मामा तिला मारत असे. कारण त्यांच्या घरातील मुलींना डान्स करण्याची परवानगी नव्हती. अशा परिस्थितीत ती मोठी झाली. तिला इंडस्ट्रीमध्ये येण्याची खूप इच्छा होती. परंतु या सगळ्याला तिच्या आई वडिलांची अजिबात परवानगी नव्हती. ते तिचे लग्न लावून देणार होते. परंतु त्यावेळी राखीने तिच्या करिअरसाठी एक मोठे पाऊल उचलले. तिने घरातील पैसे चोरले आणि ती घरातून पळून गेली. त्यानंतर तिने घरच्यांशी असलेले सगळे संबंध तोडले आणि ती एकटी राहू लागली.

इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी तिने घर तर सोडले. परंतु अभिनायाबाबत तिला काहीही माहित नव्हते. तिने कधी फोटोशूट केले नाही नव्हते. तिचे शिक्षण पूर्ण झाले नव्हते. तिला आयटम सॉंग काय असतं हे देखील माहित नव्हते. तिने सांगितले की, सुरुवातीला तिला अनेक नकार मिळाले. अनेकवेळा नकार मिळाल्यानंतर राखीने तिची सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. तिने १२ वर्षांपूर्वी तिच्या नाकाची आणि ब्रेस्टची सर्जरी केली. यानंतर तिने पुन्हा एकदा ऑडिशन देण्यास सुरुवात केली. यानंतर तिला ‘जोरू का गुलाम’, ‘जिस देश मे गंगा रहती है’ यांसारख्या चित्रपटात काम मिळाले.

राखीने तिचे स्वयंवर रचून ‘राखी का स्वयंवर’ मधून रियॅलिटी शोमध्ये पदार्पण केले. २००९ मध्ये झालेल्या या शोमध्ये तिने टोरंटोमधील एका मुलाशी लग्न केले होते. परंतु काही महिन्यातच ते वेगळे झाले होते. तिने बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली आहे. २००५ साली आलेले ‘परदेसीया’ हे गाणे सुपरहिट झाले होते. तसेच तिने ‘बिग बॉस १४’ मध्ये देखील भाग घेतला होता. त्यानंतर तिच्या लोकप्रियतेत खूप भर पडली आणि तिला सर्वत्र ओळख मिळाली. आता देखील ती अनेक ठकाणी स्पॉट होत असते. अनेक मुद्यांवर तिचे मत मांडत असते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेचा विषय बनत असते.

राखीने हिंदी नाही तर मराठीमध्ये देखील काम केले आहे. ती काही मालिकांमध्ये देखील झळकली आहे. राखी नेहमीच तिचे वेगवेगळे अतरंगी आणि विचित्र अवतार करून बाहेर फिरताना दिसते. तिचे हे व्हिडिओ तुफान व्हायरल होतात.

हेही नक्की वाचा-
‘या’ कारणामुळे शाहरूख खान झाला होता डिप्रेशनचा शिकार, म्हणला…
वस्त्रहरणाचा सीन दिल्यानंतर अर्धा तास रडत होत्या रूपा गांगुली, अशाप्रकारे शूट झाला सीन

हे देखील वाचा