Friday, July 5, 2024

दगडी चाळ २ : पुन्हा एकदा सिनेमागृहात रंगणार दगडी चाळीचा थरार, डॅडींच्या चित्रपटाचा जबरदस्त टिझर पाहाच

‘चुकीला माफी नाही’ म्हणत अभिनेते मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) यांच्या जबरदस्त अभिनयाने दगडी चाळ हा चित्रपट प्रचंड गाजला. मुंबई शहराचे रॉबिन हूड म्हणून ओळखले जाणारे डॉन अरुण गवळी यांच्या आयुष्यावरील या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. अभिनेता अंकुश चौधरी, पूजा सावंत यांचा दमदार अभिनयाला आणि मकरंद देशपांडे यांच्या डॅशिंग भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आता हाच थरार आणि मुंबईच्या गुन्हेगारी जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या अरुण गवळी यांच्या जिवनावरील दगडी चाळ २ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ज्याची माहिती दिग्दर्शक चंद्रकांत कनसे यांनी दिली आहे. 

अरुण गुलाब गवळी संपूर्ण देशाच्या गुन्हेगारी जगताला पुरून उरलेला डॉन. या माणसाच्या दहशतीनेच अनेक गुंडाना मुंबई सोडावी लागली. दगडी चाळीमधून संपूर्ण मुंबईवर राज्य करणाऱ्या  अरुण गवळी यांच्यावरील दगडी चाळ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना दगडी चाळीचा थरार पडद्यावर पाहायला मिळणार आहे ज्याचा एक व्हिडिओ दिग्दर्शक मकरंद कनसे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CfA9igapxy6/?utm_source=ig_web_copy_link

धोधो कोसळणारा पाऊस, छत्री घेऊन उभी राहिलेली माणस आणि याच गर्दीतून मकरंद देशपांडे म्हणजेच डॅडींची जबरदस्त एंट्री या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र शर्ट-पायजमा, झुपकेदार मिशा, नजरेत आगीच्या ज्वाळा, काटक शरीरयष्टी, गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचे नाव दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ डॅडींचा हा रुबाब प्रत्येकालाच वेड लावणारा आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या छोट्याशा सिक्वेलवरुनच हा चित्रपट पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचे दिसत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन संगीता अहिर यांनी केले आहे. १८ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाची सर्वांनाच जोरदार उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा-

रश्मीका मंदानाच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, ‘पुष्पा २’ मध्ये होणार श्रीवल्लीचा मृत्यू

केदार शिंदे यांनी शिवसेनेबाबत व्यक्त केली मोठी खंत, दिग्दर्शकाची पोस्ट वाऱ्याच्या वेगाने व्हायरल

जेव्हा बॉलिवूड निर्मात्याने केला होता शाहरुख खानचा अपमान म्हणाला, ‘तू बॉक्स ऑफिसवर चालणार नाहीस’

हे देखील वाचा