Wednesday, July 3, 2024

आठ वर्षीय आदित्य पाटील ठरला ‘डान्स दिवाने ज्युनिअर’चा अंतिम विजेता, बक्षिस म्हणून मिळाली ‘इतकी’ रक्कम

‘डान्स दिवाने ज्युनियर्स’ (Dance Deewane Juniors) या डान्सिंग रिअलिटी कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनचा अंतिम विजेता रविवार ( १७, मार्च) रोजी घोषित करण्यात आला. 8 वर्षीय आदित्य पाटील हा या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनचा विजेता ठरला आहे. जवळपास तीन महिने चाललेल्या या कार्यक्रमामध्ये ग्रँड फिनालेमध्ये निर्मात्यांनी आदित्यला कार्यक्रमाचा विजेता घोषित केले. आदित्यसह प्रतीक कुमार नायक आणि गीत कौर बग्गा या कार्यक्रमाचे अंतिम स्पर्धक होते. १३ आठवडे चाललेल्या या कार्यक्रमातील खडतर स्पर्धा, आणि अनेक फेसऑफनंतर आदित्य ‘डान्स दिवाने ज्युनियर्स’च्या पहिल्या सीझनचा विजेता ठरला आहे.

स्पर्धेचा विजेता आदित्य पाटील याला ट्रॉफी आणि 20 लाख रुपयांचा धनादेश बक्षीस म्हणून मिळाला आहे. परिक्षक नीतू कपूर आणि मारझी पेस्टोनजी यांनी कार्यक्रमातील सहभागी प आमिर खानच्या हस्ते आदित्यला बक्षिसाची रक्कम सुपूर्द केली. आमिर त्याच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येथे आला होता. यादरम्यान आमिरने अनेक गाण्यांवर परफॉर्मन्सही दिला.

8 वर्षीय आदित्य पाटीलने ‘डान्स दिवाने ज्युनियर्स’ मधील त्याच्या नृत्य प्रदर्शनासह उत्कृष्ट पदार्पण केले आणि तो सीझनमधील सर्वोत्कृष्ट स्पर्धक बनला. शोमध्ये त्याचे शिक्षक प्रतीक उतेकर होते, ज्यांनी तिचे नृत्यदिग्दर्शन आणि दिग्दर्शन केले होते. शोमध्ये आदित्य आणि प्रतीकचे खूप कौतुक झाले आहे. आदित्यने आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

आदित्य पाटीलला विजयी घोषित केल्यावर त्याने “मी या शोचा विजेता म्हणून सिलेक्ट येईन असे मला कधीच वाटले नव्हते. जिंकणे हे माझ्या आजोबांचे स्वप्न होते आणि मी त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकलो याचा मला खूप आनंद आहे. डान्स दिवाने ज्युनियर्सचा प्रवास माझ्यासाठी खूप संस्मरणीय आहे आणि याने मला अनेक नवीन गोष्टी शिकवल्या आहेत,” अशा शब्दात आपला आनंद व्यक्त केला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा