हरियाणवी ‘डान्सिंग क्वीन’ सपना चौधरी नेहमीच आपल्या गाण्यांमुळे चर्चेचा विषय ठरत असते. आज तिचे गाणे केवळ हरियाणातच नव्हे, तर देशभरात धमाल करतात. तिचा डान्स पाहण्यासाठी चाहत्यांची अक्षरश: गर्दी होते. सपनाने प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. ती डान्स आणि अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियावरही अधिराज्य गाजवताना दिसते. सपनाचे फोटो असो किंवा व्हिडिओ, ते काही क्षणातच व्हायरल होतात. अशामध्ये तिचा एक फोटो समोर आला आहे. जो तिच्या चाहत्यांसाठी कोणत्याही सरप्राईझपेक्षा कमी नाही. या फोटोमध्ये सपना बेबी बंपसोबत दिसत आहे.
सपना चौधरीचा एक फोटो सध्या खूपच चर्चेत आहे. या फोटोत ती आपले बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. खरं तर सपनाचा हा फोटो आजचा नाही, तर बऱ्याच महिन्यांपूर्वीचा आहे. सपनाचा हा फोटो तिच्या फॅन पेज अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की, तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली असून, लाल रंगाची ओढणी डोक्यावर घेतली आहे.
दुसरीकडे तिच्या भांगेत सिंदूर, हातात हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र घातल्याचे दिसत आहे. यासोबतच सपना आपल्या बेबी बंपवर हात ठेवून खूपच आनंदी दिसत आहे. डान्सरचे हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. चाहत्यांनी यावर हार्ट, गुडलक इमोजी कमेंट करत शुभेच्छा देत आहेत.
खरं तर मागील वर्षी म्हणजेच ऑक्टोबर, २०२० मध्ये अचानक सपना चौधरी आई बनल्याच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. सपनाने एका मुलाला जन्म दिला आहे. आई बनल्याच्या गोड बातमीने ती खूपच चर्चेत होती. या बातमीसोबत तिच्या लग्नाचाही खुलासा झाला होता. सपनाने जानेवारीमध्ये हरियाणवी गायक, लेखक आणि मॉडेल वीर साहूसोबत कोर्ट मॅरेज केले होते.
सपना चौधरीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती सध्या एँड टीव्हीवरील ‘मौका- ए- वारदात’मध्ये रवी किशन आणि मनोज तिवारीसोबत शो होस्ट करत आहे. याव्यतिरिक्त तिने हरियाणवी इंडस्ट्रीसोबतच भोजपुरी, पंजाबी आणि बॉलिवूडमध्येही काम केले आहे. तिने ‘दोस्ती के साईड इफेक्ट्स’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याव्यतिरिक्त ती ‘बिग बॉस ११’चा देखील भाग राहिली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…