Sunday, May 19, 2024

Satish Joshi Death | दुःखद !! स्टेजवर अभिनय करतानाच जेष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन

Satish Joshi Death | मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी (Satish Joshi) यांचे निधन झालेले आहे. याबाबतची पोस्ट अभिनेते राजेश देशपांडे यांनी शेअर केलेली आहे. अभिनयावर तसेच रंगभूमीवर अतोनात प्रेम असणाऱ्या या कलाकाराने स्टेजवरच शेवटचा श्वास घेतलेला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार सृजन द क्रिएशन या संस्थेच्या चौथा वर्धापन दिनानिमित्त एक कार्यक्रम चालू होता. या कार्यक्रमासाठी सतीश जोशी देखील सहभागी झाले होते. परंतु कार्यक्रम सुरू असताना स्टेजवर कोसळून त्यांचे निधन झालेले आहे. याबाबतची माहिती त्यांच्या मित्र राजेश देशपांडे यांनी देताना सोशल मीडियावर दिली आहे की, “आमचे ज्येष्ठ मित्र अभिनेते सतीश जोशी यांचे आज रंगोत्सवात स्टेजवरच निधन झाले जाण्यापूर्वी त्यांनी अभिनय पण केला होता.”

त्यांच्या निधनाने अनेक कलाकारांनी त्यांचे चाहते हळहळ व्यक्त करत आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण केलेली आहे. सतीश जोशी यांनी अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. त्यांची भाग्यलक्ष्मी ही मालिका सगळ्यांना खूप आवडली होती. मालिकेतील त्यांच्या पात्राची देखील खूप वाहवा झाली होती या मालिकेमुळे ते घराघरात पोहोचले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

गरमीने नाही तर ऑरीची एका दिवसाची कामे वाचून उडतील तुमचे होश
आशुतोष राणा यांनी त्यांच्या डीपफेक व्हिडिओवर दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘हे मानवतेला धोका आहे’

हे देखील वाचा