Friday, November 22, 2024
Home अन्य ‘वजन कमी कर जाड झालीयेस’, लेटेस्ट व्हिडिओत कंबर लचकवणाऱ्या सपनाच्या पोस्टवर चाहत्याची लक्षवेधी कमेंट

‘वजन कमी कर जाड झालीयेस’, लेटेस्ट व्हिडिओत कंबर लचकवणाऱ्या सपनाच्या पोस्टवर चाहत्याची लक्षवेधी कमेंट

सुरुवातीला आपल्या डान्ससाठी गाव पातळीवर प्रसिद्ध असणारी ‘हरियाणवी क्वीन’ सपना चौधरी आता भलतीच गाजतेय. सपना चौधरीने तिच्या डान्सने मोठा चाहतावर्ग कमावला आहे. तिला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. आता तिचे देश आणि परदेशातही चाहते आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. त्यावर ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते. व्हिडिओतील तिचा देसी अंदाज, डान्स आणि अदा पाहून चाहतेही घायाळ झाल्याशिवाय राहत नाहीत. अशात सपनाचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सपना चौधरीचा नवीन व्हिडिओ
अभिनेत्री सपना चौधरी (Sapna Choudhary) हिचा नवीन व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडतोय. या व्हिडिओत सपना खास स्टाईलमध्ये कंबर लचकवताना दिसत आहे. कधी ती केस उडवताना, तर कधी भिंतीवर हात ठेवून हसताना दिसत आहे. या व्हिडिओत सपनाने हिरव्या रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.

सपनाची पोस्ट
सपनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘घागरा’ गाणे वाजत आहे. या गाण्याचे बोल ‘ये खबर छपी है अख़बार में, हमारी खूब चरचा है बाज़ार में’ सपनाने तिच्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये वापरले आहेत. तिचा हा अंदाज पाहून चाहते भलतेच खुश झाले आहेत. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, 800 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

सपनाचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे. एकाने कमेंट करत लिहिले की, “जाड झालीयेस वजन कमी कर.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “जिम सुरू कर नाहीतर भविष्यात तुला करिअरमध्ये खूप त्रास सहन करावा लागेल.” आणखी एकाने तिच्या गाण्यांवर कमेंट केली. त्याने लिहिले की, “आता तुझ्या गाण्यांमध्ये आधीसारखी मजा नाही.”

डान्सव्यतिरिक्त बेधडक अंदाजासाठीही प्रसिद्ध आहे सपना
सपना चौधरी हिचा देसी आणि बेधडक अंदाज तिची खासियत आहे. ती जेव्हाही ट्रोल होते, तेव्हा ती जबरदस्त प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहत नाही. सपनाच्या याच अंदाजाचे चाहते दीवाने आहेत. सपनाने डान्सव्यतिरिक्त सिनेमातही काम केले आहे. तिने ‘वीरे दी वेडिंग’, ‘दोस्ती के साईड इफेक्ट्स’ यांसारख्या सिनेमात अभियनाचा डंका वाजवला आहे. विशेष म्हणजे, ती ‘बिग बॉस’चाही भाग होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
याला म्हणतात जलवा! ‘किंग खान’ला समोरासमोर पाहून आनंदाने किंचाळली हॉलिवूड अभिनेत्री, व्हिडिओ पाहाच
अपघातानंतर आता कशीये जुबिन नौटियालची तब्येत? हॉस्पिटलच्या बेडवरून फोटो शेअर करत म्हणाला…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा