Friday, April 26, 2024

अपघातानंतर आता कशीये जुबिन नौटियालची तब्येत? हॉस्पिटलच्या बेडवरून फोटो शेअर करत म्हणाला…

गुरुवारी (दि. 01 डिसेंबर) प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल आपल्याच घरातील पायऱ्यांवरून पडला होता. त्यामुळे त्याच्या कोपराला जबर दुखापत झाली आणि बरगड्यांवरही मार लागला. याव्यतिरिक्त त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली. या घटनेनंतर त्याला मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशात जुबिन नौटियालची हेल्थ अपडेट समोर आली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, जुबिनच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गायकाने स्वत: सोशल मीडियावरून आपल्या तब्येतीविषयी सांगितले आहे.

जुबिनने चाहत्यांना दिली माहिती
गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) याने इंस्टाग्रामवर रुग्णालयातून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत जुबिन रुग्णालयातील बेडवर टेकून बसल्याचे दिसत आहे. या फोटोत दिसते की, तो जेवण करत आहे. त्याने या फोटोसोबत असेही सांगितले आहे की, आता तो बरा आहे. त्याने या फोटोसोबत एक नोटही लिहिली आहे.

जुबिनची इंस्टाग्राम पोस्ट
जुबिनने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. देव मला पाहत होते आणि या गंभीर घटनेतून त्यांनी मला वाचवले आहे. मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. माझ्या तब्येतीत सुधारणा होत आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमासाठी आणि प्रार्थनांसाठी मनापासून धन्यवाद.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Jubin Nautiyal (@jubin_nautiyal)

जुबिनच्या या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस
जुबिनच्या या पोस्टवर चाहते कमेंट करत तो लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. यासोबतच कलाकारांनीही जुबिनच्या पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. गायिका नीति मोहन हिने लिहिले की, “लवकर बरे व्हा, खूप प्रेम.” रॅपर बादशाह याने कमेंट करत लिहिले की, “लवकर बरा हो भावा.” याव्यतिरिक्त इतर युजर्सही कमेंट करत त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

नुकतेच गायकाने ‘गोविंदा नाम मेरा’ सिनेमातील गाणे ‘बना शराबी’ हे गाणे गायले होते. त्याने ‘थँक गॉड’ सिनेमातील ‘मनिके मागे हिथे’ या गाण्यालाही आपला आवाज दिला होता. याव्यतिरिक्त त्याने अनेक हिट गाणी गायली आहेत. त्यामध्ये ‘लुट गए’, ‘हमनवा मेरे’, ‘तुझे कितना चाहने लगे हम’, ‘तुम ही आना’ यांसारख्या अनेक गाण्यांचा समावेश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
भारीच! एव्हरग्रीन अभिनेत्री वहिदा रेहमानच करायच्या देव आनंद यांच्याशी फ्लर्ट; म्हणायच्या, ‘तुम्ही…’
देव आनंद यांच्या रूपावर मरायच्या तरुणी, शासनाने ‘या’ कारणामुळे थेट सूट घालण्यावर आणलेली बंदी?

हे देखील वाचा