आज आपला देश ७५ वा स्वातंत्रदिन साजरा करत आहे. या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह फक्त आपल्या देशातच नाही, तर परदेशातही पाहायला मिळत आहे. आज आपल्या तिरंगाच्या रंगात संपूर्ण जगच जणू न्हाऊन निघाल्याची भावना आपल्याला सर्वत्र पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर आपण पाहिले, तर आपल्या लक्षात येईल की, अनेक परदेशी नागरिक देखील आपल्या देशाचा हा गौरवदिन साजरा करत आहेत.
आजच्या या अमृतमहोत्सवी स्वातंत्रदिनाच्या दिवशी असाच परदेशी नागरिकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ आहे सोशल मीडिया सेन्सेशन असणाऱ्या अमेरिकन रिकी पाँड यांचा. मूळचे अमेरिकन असलेल्या रिकी पाँड यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट त्यांचा एक डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ते भारतीय पोशाख परिधान करून ‘चक दे इंडिया’ चित्रपटातील ‘चक दे इंडिया’ या गाण्यात नाचताना दिसत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून रिकी पाँड यांनी अनोख्या पद्धतीने भारताचा स्वातंत्र दिन साजरा केला आहे. (dancing dad Ricky pond dance on chak de song)
रिकी पाँड हे अमेरिकन असून ते सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. त्यांचे डान्सिंग व्हिडिओ इंस्टाग्राम नेहमीच गाजताना दिसतात. अमेरिकन असणारे रिकी पाँड हे फक्त आणि फक्त बॉलिवूड आणि मराठी गाण्यांवर डान्स करतात. त्यांचे हे व्हिडिओ तरुणांमध्ये खूपच गाजतात. कोरोना महामारीच्या काळात असलेल्या लॉकडाऊनमध्ये वेळ घालवण्यासाठी रिकी पाँड यांनी असे डान्स व्हिडिओ तयार करून ते इंस्टाग्रामवर पोस्ट केले आणि हळूहळू ते इंस्टाग्रामवर हिट झाले.
रिकी पाँड यांना ‘डान्सिंग डॅड’ या नावाने देखील ओळखले जाते. या डान्समुळे त्यांना तुफान लोकप्रियता मिळाली आणि त्यांच्या फॉलोवर्समध्ये वाढ झाली. आज त्यांना इंस्टाग्राम अकाउंटवर ४ लाखांपेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत. तुम्ही त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट पाहिले, तर अनेक हिट गाण्यांवर त्यांचे भन्नाट डान्स व्हिडिओ पाहायला मिळतील.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-