दंगल चित्रपटामध्ये छोट्या बबीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागरचे निधन झालं आहे. अवघ्या १९ व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे सिनेसृष्टीत शोककाळा पसरली आहे. सुहानीने ‘दंगल’ सिनेमात आमिर खानची मुलगी असलेल्या छोट्या बबिताची भूमिका साकारली होती.
दंगल सिनेमानंतर सुहानी सिनेसृष्टीपासून दूर होती. ती सोशल मीडियावरही फारशी अॅक्टीव्ह नव्हती. काही दिवसांपूर्वी तिचा अपघात झाला होता. त्यामध्ये तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. फ्रॅक्चर घालण्यात आले होते. या उपचारा दरम्यान जे औषध घेण्यात आले होते त्याचा दुष्परिणाम तिच्या शरिरात झाला. हळूहळू तिच्या शरीरात एक द्रव साचू लागला. गेल्या काही दिवसांपासून सुहानी दिल्ली येथील एम्स रुग्णलयात उपचार घेत होती. दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सुहानीच्या पार्थिवावर फरिदाबादच्या सेक्टर-15 येथील अजरौंडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुहानी बॉलिवूडमधील प्रसिद्ध बालकलाकार होती. तिने २०१६ मध्ये आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटात दमदार भूमिका साकारली होती. यामध्ये तिने ज्युनिअर बबिता फोगाटची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने बऱ्याच जाहिरातींमध्येही काम केलं आहे.
‘दंगल’ या चित्रपटानंतर सुहानीने काही काळ ब्रेक घेतला. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने चित्रपटांच्या ऑफर्स स्वीकारले नाकारल्या होत्या.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘पुरुष प्रधान आहे टॉलीवुड फिल्म इंडस्ट्री; राधिका आपटेचा ‘तो’ वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल
एक खोटारडी.. तर दुसरी कोण असेल? ‘विश्वामित्र’मधील अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला