Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

ही तर हाईटच झाली! प्रमोशन करण्यासाठी थेट अभिनेत्रीच्या पायात पडला प्रसिद्ध दिग्दर्शक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे सतत आपल्या चित्रपाटमुळे आणि वक्तव्यामुळे ओळखले जातात. इंडस्ट्रीमध्ये त्यांना कोणत्याच ओळखीची गरज नाही. दिग्दर्शक सध्यातर साउथ चित्रपटापर्यतच राहिले आहेत असेही म्हटले जाते की. गोपल वर्मा आपला चित्रपट पर्दर्शित कण्यासाठी कोणत्याच गोष्टीची परवा करत नाहीत. त्यामुळे ते अनेकदा वादाच्या घेऱ्यातही अडकले आहेत. मात्र, नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, त्यामुळे  गोपाल वर्मा चर्चेचा विषय बनले आहेत.

प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा नुकताच नवीन चित्रपट ‘डेंजरस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचे प्रमोशन त्यांनी अशाप्रकारे केले आहे, ज्याला पाहूण प्रत्येकाच्याच भुवया उंचावल्या आहेत. सोशल मीडियावर राम गोपाल वर्माचे एका अभिनेत्रीसोबतचे काही विचीत्र फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. दिग्दर्शकाने अशाप्रकारे चित्रपटाला प्रमोट करण्याची पद्धत कोणालाच आवडली नसून सोशल मिडियावर त्यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे.

झाले असे की, राम गोपाल वर्मा यांनी ‘डेंजरस’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भलतीच तिकडम लावली आहे. दिग्दर्शकाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते चित्रपटातील अभिनेत्रीला फुट मसाज देताना दिसत आहेत, मात्र, यामध्ये चुकीचं म्हणजे अभिनेत्री सोफ्यावर बसली असून तिच्या पायाला दिग्दर्शक किस करताना दिसत आहे. दिग्दर्शकाने हा व्हिडिओ स्वत: आपल्या ट्वीटर अकाउंवरुन शेअर केले असून कॅप्शनमध्ये लिहेल आहे की, “आशू रेड्डीमध्ये डेंजर मार्क कुठे आहे? फुल व्हिडिओ 30 मिनिटात 9 :30 वर. राम गोपाल अभिनेत्रीचा पाय आपल्या हातामध्ये धरुन खाली बसून कॅमेऱ्याकडे बघत आहेत.”

राम गोपाल यांच्या पोस्टमुळे चाहत्यांनी खूपच संताप व्यक्त केला आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहले की, “मला खूप वाइट वाटतंय राम गोपाल सरला असे पाहूण, कधा हे इंडियन चित्रपटाचे टॉप दिग्दर्शकही होते, ज्यांच्यासोबत अनेक कलाकारांना काम करायचे होते.” दुसऱ्याने लिहिले की, “रामू हे काय आहे. तुम्ही तर असे नव्हतात उठा.” डेंजरस चित्रपट हा एक लेसबियन क्राइम स्टोरी असून अप्सरा रानी (Apsara Rani) आणि नैना गांगुली (Naina Ganguli) या अभिनेत्री मुख्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट (दि, 9 डिसेंबर) रोजी सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चित्रपटांमध्ये बिकिनी घालणाऱ्या पहिल्या अभिनेत्री होत्या शर्मिला टागोर, बोल्ड इमेजने लावली होती थेट संसदेपर्यंत आग
प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी शेअर केली थ्रोबॅक लव्हस्टोरी, दिला टायगर पतौडींसोबतच्या आठवणींना उजाळा

हे देखील वाचा