Sunday, April 14, 2024

चित्रपटांमध्ये बिकिनी घालणाऱ्या पहिल्या अभिनेत्री होत्या शर्मिला टागोर, बोल्ड इमेजने लावली होती थेट संसदेपर्यंत आग

बॉलिवूडच्या 100 पेक्षा अधिक वर्षांच्या मोठ्या इतिहासात अनेक दिग्गज आणि प्रतिभावान कळकरांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ज्या काळात महिलांनी घराचा उंबरठा ओलांडू नये असे कडक नियम होते त्याच काळात अनेक उत्कृष्ट अभिनेत्रींनी त्यांच्या अभिनयाची चुणूक सर्वांना दाखवली. सुरुवातीच्या काही दशकांमध्ये चित्रपटात काम करणाऱ्या सर्व अभिनेत्री ह्या पूर्ण कपड्यांमध्ये आणि अतिशय सध्या, सोज्ज्वळ दिसायच्या. आजच्या काळासारख्या बोल्ड, मॉडर्न नव्हत्या त्या. मात्र याच विचारांना एका अभिनेत्रीने तडा देत अभिनेत्रीची एक वेगळीच इमेज जगासमोर आणली. त्या अभिनेत्री होत्या शर्मिला टागोर. हो अभिनेत्री शर्मिला यांनी अभिनेत्रींच्या सध्या, भोळ्या इमेजला मोडत त्यांची बोल्ड बाजू सर्वांसमोर आणली. आज शर्मिला त्यांचा 78 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या एका बोल्ड बाजूबद्दल.

शर्मिला टागोर यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात ‘सत्यजित रे’ यांच्या ‘अपुर संसार’ या सिनेमातून केली. त्यानंतर ‘कश्मीर की कली’ सिनेमातून शम्मी कपूर यांच्यासोबत त्यांनी बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केले. शर्मिला टागोर ह्या भारतातील पहिल्या अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी पहिल्यांदा बिकिनी घातली होती. शर्मिला यांनी 1966 साली फिल्मफेयर मासिकासाठी बिकिनी घालून फोटोशूट केले होते. त्यानंतर 1967 साली आलेल्या ‘एन इव्हिनिंग इन पॅरिस’ सिनेमात त्यांनी स्वीमसूट घातला होता. त्याचवर्षी आलेल्या ‘आमने सामने’ सिनेमातही त्यांनी स्वीमसूट घालून सीन दिले होते. या चित्रपटानंतर त्या बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

sharmila tagor
Photo Courtesy : YouTube/Screengrab/bollywood bioscope

ज्या काळात देशात अजिबातच बिकिनीचे चलन नव्हते त्याच काळात शर्मिला यांनी एका मागोमाग एक चित्रपटांमध्ये बिकिनी घालून सीन दिले. त्यांच्या या सीन्समुळे खूप चर्चा झाल्या. त्या अनेक विवादांमध्ये देखील अडकल्या. संसदेत देखील त्यांच्या बोल्ड अवताराच्या चर्चा झाल्या खूप गोंधळ उडाला होता.

ज्या दिवसांमध्ये त्या त्यांच्या बोल्ड अवतारामुळे हिट झाल्या होत्या, त्याच काळात त्या क्रिकेटर मन्सूर अली यांना डेट करत होत्या. त्यांचे बिकिनी लूकमधील सिनेमाचे पोस्टर मुंबईत प्रत्येक ठिकाणी लावले गेले होते. आणि तेव्हाच मन्सूर अली यांच्या आई शर्मिला यांना भेटण्यासाठी मुंबईमध्ये येणार होत्या. तेव्हा शर्मिला यांनी निर्मात्याना फोन करून एका रात्रीत त्यांचे हे पोस्टर काही दिवसांसाठी काढून टाकले होते. पुढे 1968 साली त्यांनी मन्सूर अली यांच्याशी लग्न केले. त्यांना सैफ अली खान, सोहा अली खान आणि सबा अली खान ही तीन मुले आहेत.

sharmila tagor
Photo Courtesy : YouTube/Screengrab/ultra

शर्मिला यांनी त्यांच्या काळातील प्रत्येक अभिनेत्यासोबत काम केले. अनेक हिट सिनेमे त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये दिले, ज्यात ‘वक्त’, ‘अनुपमा’ और ‘देवर’,’अमर प्रेम’, ‘सफर’, ‘आराधना’, ‘मालिक’, ‘छोटी बहु’, ‘राजा रानी’ आदी अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चित्रपटांमध्ये बिकिनी घालणाऱ्या पहिल्या अभिनेत्री होत्या शर्मिला टागोर, बोल्ड इमेजने लावली होती थेट संसदेपर्यंत आग
प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी शेअर केली थ्रोबॅक लव्हस्टोरी, दिला टायगर पतौडींसोबतच्या आठवणींना उजाळा

हे देखील वाचा