Wednesday, March 22, 2023

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न, रक्ताच्या थारोळ्यात दवाखान्यात केले दाखल

कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध बंगाली अभिनेते सैबल भट्टाचार्य यांनी कथितरीत्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी कोलकाता येथील राहत्या घरी हे धक्कादायक पाऊल उचलले आहे. यामुळे त्यांना खूपच दुखापतही झाली आहे. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे कलाविश्व हादरले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओत बंगाली अभिनेते सैबल भट्टाचार्य (Saibal Bhattacharya) यांना गंभीर दुखापत झाल्याचे दिसत आहे. इतकेच नाही, तर त्यांचा चेहरा रक्तबंबाळ झाल्याचेही दिसत आहे. या घटनेनंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सैबल भट्टाचार्य यांना ‘प्रोथोमा कादम्बिनी’ या बंगाली मालिकेतून प्रसिद्धी मिळाली होती. माध्यमांतील वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, सोमवारी ७ ऑगस्ट रोजी अभिनेत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी स्वत:ला धारदार शस्त्रांनी स्वत:ला जखमी केले होते. सध्या चित्ररंजन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांच्या तब्येतीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाहीये. माध्यमांतील वृत्तानुसार, ते त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलेच चिंतेत होते. त्यांना नैराश्य आल्याने त्यांनी हे मोठे पाऊल उचलले होते.

नशेत असायचे सैबल भट्टाचार्य
सैबल यांनी व्हिडिओत त्यांच्या परिस्थितीसाठी पत्नी आणि तिच्या माहेरच्यांना जबाबदार ठरवले आहे. जेव्हा त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते नशेत होते. असे म्हटले जात आहे की, ते नैराश्यात असल्यासोबतच दारुच्या नशेतही असायचे. सैबल यांनी ‘अमर दुर्गा’, ‘कोरी खेला’, ‘उरोन टुब्री’ आणि ‘मिठाई’सह अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
विद्युत जामवालचा विषयच खोल! रस्ता सोडून पठ्ठ्याने झाडावरच केले स्केटिंग, व्हिडिओ पाहाच
मौनीने पतीचा वाढदिवस बनवला यादगार, अभिनेत्री बोटीतच झाली रोमँटिक; फोटो व्हायरल
सोनमने घालवली कपूर खानदानाची इज्जत! म्हणाली, ‘माझ्या मैत्रिणींसोबत झोपलेत माझे सर्व भाऊ’

हे देखील वाचा