लंडनच्या लेस्स्टर स्क्वेअरमध्ये शाहरुख खान आणि काजोल यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ (डीडीएलजे) या आजपर्यंतच्या सर्वाधिक काळ चालणार्या हिंदी चित्रपटात लेस्स्टर स्क्वेअरमधील एक दृश्य दाखवण्यात आले आहे. २०२१ च्या मध्यात या पुतळ्याचे अनावरण होईल. युनायटेड किंगडममध्ये बॉलिवूड चित्रपटावर आधारित हा पहिलाच पुतळा असेल.
भारतीय चित्रपटसृष्टीस सर्वाधिक पसंतीस उतरलेला ‘डीडीएलजे’ चित्रपटाच्या २५ व्या वर्धापन आणि यश राजा फिल्म्सच्या ५० वा वर्धापनदिन हे समीरकरण चांगले जुळून आले असे म्हणले पाहिजे.
आदित्य चोप्रा यानी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ‘डीडीएलजे’ ने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला. हा आतापर्यंतचा सर्वाधिक काळ चालणारा हिंदी चित्रपटही बनला! डीडीएलजेने त्यावेळी सर्वाधिक १० फिल्मफेअर पुरस्कारही जिंकले होते.
.@iamsrk and @itsKajolD's #DDLJ Statue to be unveiled in Leicester Square Statue to mark the film’s 25th Anniversary. #DDLJ25
Read more – https://t.co/7aLxUOVAmr pic.twitter.com/eUF0cfWN9P— Yash Raj Films (@yrf) October 19, 2020
हा चित्रपट ४ कोटी रुपये खर्च करून बनविण्यात आला होता आणि १९९५ साली या चित्रपटाने भारतात ८९ कोटी, तर परदेशात १३.५० रुपये कोटी गोळा केले होते. १९९५ साली जगभरातून या चित्रपटाने एकूण १०२.५० कोटी रुपये कमवले होते! आजच्या मूल्यात जर विचार केला तर, ‘डीडीएलजे’ने भारतभरातून तब्बल ४५५ कोटी आणि परदेशी प्रांतांमधून ६९ कोटी इतकी रक्कम कमवली आहे, तर एकूण जगभरातील रक्कम ५२४ कोटी इतकी होते.
‘डीडीएलजे’, बॉलिवूड सिनेमाचा रोमिओ आणि ज्युलियट म्हणून ओळखला जातो. ही कहाणी राज आणि सिमरन या दोन अनिवासी भारतीय आणि किंग्ज क्रॉस स्टेशनच्या ट्रेनने सुरु झालेल्या त्यांच्या प्रवासाबरोबर युरोप आणि भारतात खुललेल्या त्यांच्या प्रेमकहाणी सोबत पूढे जाते. हा नवीन पुतळा ओडियन सिनेमाच्या बाहेर ईस्टर्न टेरेस च्या जवळ लावला जाईल. या चित्रपटात लंडनच्या इतर ठिकाणांपैकी हॉर्सगार्ड्स अव्हेन्यू, हायड पार्क, टॉवर ब्रिज आणि किंग्ज क्रॉस स्टेशनचा देखील समावेश आहे.