Wednesday, October 9, 2024
Home हॉलीवूड ‘डेडपुल 3’ची शुटींग पुर्ण, अभिनेत्याने केली पोस्ट शेअर; रिलीज डेटही जाहीर

‘डेडपुल 3’ची शुटींग पुर्ण, अभिनेत्याने केली पोस्ट शेअर; रिलीज डेटही जाहीर

राइटर स्ट्राइकमुळे हाॅलीवूडचे(Hollywood) अनेक चित्रपट लांबनीवर पडले आहेत. या रायटर स्ट्राइकचा परिणाम मार्वल(Marvel) जगतावरही झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना जरी आतुरता लागली असली तरी मार्वलचे अनेक चित्रपट हे आधी ठरलेल्या वेळेपेक्षा उशीरा रिलीज होणार आहेत. मार्वल स्टुडियोचा ‘डेडपुल 3’ देखील त्यातीलंच एक आहे. डेडपुल 3′(Deadpool 3) यावर्षीचा बहुप्रतिक्षित चित्रपटांतील एक आहे. जगभरातील चाहतावर्ग या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहे. यादरम्यान चित्रपटाविषयी एक महत्वपुर्ण अपडेट समोर आले आहे. राइटर स्ट्राइकच्या कारणामुळे ठरलेल्या वेळेपेक्षा खुप उशीर या चित्रपटाच्या शुटींगला लागला. परंतु एकदाचं हे शुट पुर्ण झाले आहे. चित्रपटाचा मुख्य अभिनेता रयान रेनाॅल्डसने स्वतः बुधवारी सोशल मिडीयावर याबाबत खुलासा केला आहे.

वेगळ्या शैलीत दिली माहिती
तो त्याच्या विनोदी शैलीने परीपुर्ण अशा पोस्टमध्ये, क्रू आणि दिग्दर्शक शाॅन लेवींना(shon levi) धन्यवाद दिले. रयानने लिहिले,” हा सुट रक्त आणि घाम लपवतो… पण आज ‘डेडपुल 3’ च्या रॅपिंगसोबत या सूटने अऋु लपवले आहेत. माझ्या टीमच्या क्रू आणि कलाकारांना खुप खुप धन्यवाद, ज्यांनी शाॅन लेवींच्या नेतृत्वाखाली वारा, पाऊस,आंदोलन आणि ह्युज जॅकमॅन यांच्याशी संघर्ष केला. मला माझ्या जवळच्या मित्रासोबत एक चित्रपट करण्याची संधी मिळाली. असे शक्यतो होत नाही. 26 जुलैला भेटुया…” यावेळी अभिनेत्याने ‘डेडपुल 3’ च्या शुटींग दरम्यानचा एक फोटोही शेअर केला आहे. परंतु या फोटोत अभिनेत्याचा चेहरा मात्र दिसत नाहीए.

यामुले शुटींग पुर्ण व्हायला झाला उशीर
या चित्रपटची मुळ रिलीज डेट ही या वर्षातील मे महिन्यात होती, परंतु राइटर स्ट्राइकमुळे(writer strike) चित्रपटाला निर्धारित वेळेत पुर्ण करता आले नाही. आता हा चित्रपट 26 जुलै 2024ला चित्रपटगृहात रिलीज होण्यासाठी तयार आहे.

चित्रपटाच्या रिलीजसाठी प्रेक्षक उत्साहित
या चित्रपटाचे चाहते दोन्ही अभिनेत्यांमधील केमिस्ट्री पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्याचसोबत प्रेक्षक लोगान (2017) मध्ये सुपरहीरोच्या मृत्युनंतरही वल्वरीन पुन्हा जीवंत कसा झाला, हे जाणुन घेण्यासाठीही उत्सुक आहेत.

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा