Thursday, April 18, 2024

Death Anniversary: ऑक्सिजनच्या बेडवर झोपायचा 150 वर्षे जगण्याची इच्छा असणारा मायकल; 12 डॉक्टर्स रोज करायचे तपासणी

खूप कमी कलाकार असे असतात ज्यांना संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात मर्यादेपलीकडे असे अमाप स्टारडम मिळते. कधी कधी अशा कलाकारांचे स्टारडम वर्णन करायला शब्द देखील अपुरे पडतात. असे न भूतो ना भविष्यती लोकप्रियता आणि कीर्ती त्यांना लाभते. असे एक नाव म्हणजे मायकल जॅक्सन. ज्याची कीर्ती, लोकप्रियता, प्रसिद्धी याबद्दल सांगताना शब्दांना देखील मर्यादा पडतील असे मायकलचे काम आणि कर्तृत्व आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वच त्याचे फॅन्स. आयुष्यात एकदा तरी मायकलचा लाईव्ह शो पाहायला मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असायची. पण हे भाग्य सर्वांनाच मिळेल असे नाही. मायकलने त्याच्या डान्सने आणि त्याच्या गाण्याने सर्वांना अक्षरशः वेड लावले होते. त्याचा आवाज, त्याचा, डान्स आणि त्याचा लूक या तीन गोष्टी म्हणजे मायकलची ओळख होत्या. अशात आज रविवारी (25 जुन)ला मायकल जॅकसन याची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याचा हा स्वप्नवत असणारा प्रवास.

‘किंग ऑफ पॉप’ ही ओळख मिळवणाऱ्या मायकलचा जन्म 29 ऑगस्ट 1958 साली अमेरिकेच्या इंडियाना भागातील अगदी छोट्या अशा ‘गैरी’ या ठिकाणी झाला. लहानपणापासूनच त्याला संगीतामध्ये खूपच रस होता. 1964 साली तो त्यांच्या भावांच्या ‘दि जॅक्सन 5’ या ग्रुपमध्ये सामील झाला. त्यानंतर गाण्यात करियर करण्यासाठीचा त्याचाच संघर्ष सुरु झाला. 1971साली त्याने एक गायक म्हणून संगीत क्षेत्रात पदार्पण केले.

पुढील काही वर्षांमध्ये त्याने त्याच्या गाण्याने जगात एक वेगळी ओळख मिळवण्यास सुरुवात केली. आणि काही काळातच तो यात यशस्वी झाला. मायकलला या काळात नस्लवादच्या अनेक आरोपांचा सामना करावा लागला. मात्र त्याने याकडे साफ दुर्लक्ष केले आणि तो त्याच्या कामात यश मिळवत गेला. मायकलला खरी ओळख ‘थ्रिलर’ या अल्बममधून मिळाली. या अल्बममने अनेक रेकॉर्ड्स देखील केले. जगात सर्वात जास्त विकला गेलेला अल्बम म्हणून या अल्बमचे नाव घेतले जाते.

पुढे ‘ऑफ दि वॉल बैड डेंजरस’, ‘हिस्ट्री’ यांनी त्याला यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहचवले. याच गाण्यानंतर त्याला ‘किंग ऑफ पॉप’ हे नवे नाव दिले गेले. सुरुवातीच्या काळात अतिशय संघर्ष करणाऱ्या मायकलने जे यश आणि जी लोकप्रियता मिळवली. ती खरंच कौतुकास्पद होती. जगभरात त्याची कीर्ती पसरली आणि तो एक ब्रँड बनला. त्याला ग्रॅमी पुरस्कार, अमेरिकन म्युझिक अवॉर्ड, ग्रॅमी लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार आदी अनेक मनाच्या पुरस्कारांनी सन्मानित केले गेले.

मायकल जेवढ्या त्याच्या गाण्यांमुळे, डान्समुळे प्रसिद्ध झाला तेवढाच त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आला होता. त्याला त्याच्या लुक्सबद्दल खूपच जिव्हाळा होता. त्यामुळेच तो सतत त्याच्या लुक्सला टिकवण्यासाठी शस्त्रक्रियांचा आधार घ्यायचा. त्याने अनेक प्लास्टिक सर्जरीच्या शस्त्रक्रिया देखील केल्या होत्या. यासाठी बऱ्याचवेळा त्याच्यावर टीका देखील झाली. मायकलवर यौन शोषणाचाच देखील आरोप लावला गेला होता.

असे सांगितले जाते की, मायकलने त्याच्या घरात स्वतःसाठी तब्बल 12 डॉक्टर्स ठेवले होते. जे दररोज त्याची तपासणी करायचे. त्याच्या व्यायामासाठी देखील जवळपास 15 लोकांची टीम ठेवली गेली होती. त्याचे जेवण सर्वप्रथम लॅबमध्ये चेक व्हायचे आणि मगच तो ते जेवण जेवायचा. मायकल तब्बल 150 वर्ष जगण्याची इच्छा होती म्हणूनच तो ऑक्सिजनच्या बेडवर झोपायचा. त्याच्या काही सवयी वाचून आपल्याला अतिशयोक्ती नक्कीच वाटेल मात्र ते म्हणतात ना ‘पैसा बोलता है’. अगदी तसेच त्याच्या बाबतीत होते. तो त्याची भयानक काळजी घ्यायचा. लोकांना भेटण्याआधी मास्क लावायचा. कोणासोबतही हात मिळवल्यानंतर हात स्वच्छ धुवायचा.

मायकल स्वतः गरिबीतून वर आल्यामुळे त्याला माहित होते की, गरिबी कशी असते आणि काय काय करायला लावते. त्यामुळे त्याने जगभरात अनेक चॅरिटी शो केले. सोबतच तो 39 चॅरिटी संस्थांसोबत जोडला गेला असल्यामुळे त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.

असे सांगितले जाते की, नशेच्या अधिक गोळ्यांच्या सेवनामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे 25 जून 2009साली निधन झाले. त्याच्या निधनानंतरही त्याचा रुतबा, त्याची ऐट आजही कायम आहे. 2009साली त्याचा अल्बम बेस्ट सेलिंग अल्बम ठरला होता. एकट्या अमेरिकेत त्याचे 82 लाख तर जगभरात 3.5 कोटी अल्बम विकल्या गेले. एका आठवड्यात २६ लाखांपेक्षा अधिक गाणे डाऊनलोड केले गेले. (michael jackson know interesting facts about pop star michael jackson)

अधिक वाचा- 
साडीतही तितकीच हॉट दिसते उर्मिला, फोटो पाहून व्हाल घायाळ
तब्बल 150 वर्षे जगण्यासाठी मायकल जॅक्सन झोपायचा ऑक्सिजन बेडवर; बूटामध्ये लपले होते डान्सचे गुपीत

हे देखील वाचा